World Mental Health Day Saam Tv
लाईफस्टाईल

World Mental Health Day: मानसिक तणावाचा झोपेवर परिणाम,अहवालातून धक्कादायक खुलासा, कारण काय?

Mental Health Day : शरीरासोबतच आता मानसिक तणावाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tele Manas Helpline No :

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या उद्भवतात. वातावरण बदल आणि कामाच्या ताणवामुळे आपल्या शरीरासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. परंतु शरीरासोबतच आता मानसिक तणावाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

या मानसिक तणावाच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने एक हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. सरकार नेहमीच नागरिकांच्या हितासाठी सुविधा पुरवत असते. त्यातील एक सेवा म्हणजे 'टेली मानस हेल्पलाइन नंबर'. हा हेल्पलाइन नंबर लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करते.

तुम्ही मानसिक समस्यांनी ग्रस्त आहात तर या 14416 नंबरवर कॉल करुन तुमच्या समस्या सांगू शकता. मानसिक समस्या होण्यामागची मुख्य कारणे कांउसरलने सांगितली आहेत. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे, कामाची चिंता, बेरोजगारी, रिलेशनशिप प्रॉब्लेम किंवा आर्थिक चिंता यामुळे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. याशिवाय मूड ऑफ होणे किंवा तणाव असण्याच्या तक्रारी येत असल्याचे सांगतात.

राज्य सरकारने ऑक्टोबर 2022 मध्ये टेली मानस हेल्पलाइन नंबर सुरु केला होता. लोकांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या जाणून घेणे, त्याचे निदान करणे आणि त्यावर योग्य उपचार घेणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. सरकारच्या मानसिक स्वास्थ नुसार, एका वर्षात हेल्पलाइन नंबरवर 30,030 कॉल आले आहेत. सरकारने यासाठी ठाणे, पुणे आणि बीड या तीन शहरात केंद्र स्थापित केले आहेत.

हेल्पलाइन नंबरवर झोप न येण्याच्या समस्या सर्वात जास्त आल्या आहेत असे सांगण्यात आले. जेव्हा त्यांना त्यांच्या सवयीबाबत विचारण्यात आले तेव्हा ते सर्वात जास्त सोशल मीडियाचा वापर करतात हे निदर्शनास आले.

याचसोबत जॉब, रिलेशनशिप, आर्थिक समस्या यामुळेही झोप येत नसल्याचे समजले. या लोकांची काउंसलिंग केली जाते. गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात बोलावले जाते. त्यांना सवयीत बदल, पौष्टिक आहार आणि योग किंवा मेडिटेशन करण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT