Google Chrome  Saam Tv
लाईफस्टाईल

Google Chrome च लवकरच येणार जबरदस्त फीचर, प्रायव्हसी आणि डेटा राहाणार सेफ

Google Chrome Safety Features : वाढत्या इंटरनेटच्या जगात आपल्यापैकी अनेक लोक इंटरनेट ब्राउजरचा वापर करतात. जर तुम्ही देखील स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर गुगल क्रोम वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

कोमल दामुद्रे

Google Chrome New Features :

वाढत्या इंटरनेटच्या जगात आपल्यापैकी अनेक लोक इंटरनेट ब्राउजरचा वापर करतात. जर तुम्ही देखील स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर गुगल क्रोम वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

गुगल (Google) क्रोम हे जगभरात अधिक प्रमाणात वापरले जाते. वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपनी प्राइव्हसी आणि सुरक्षितेची वैशिष्ट्ये आणत असते. मागच्या काही दिवसांमध्ये ऑनलाइन (Online) फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढलेल्या आहेत. त्यासाठी कंपनी लवकरच सुरक्षितेत वाढ करणार आहे. ज्यामुळे तुमचा क्रोम ब्राउझर पूर्वी पेक्षा अधिक सुरक्षित होईल.

गुगलच्या नव्या फिचरचे नाव नॅव्हिगेशनसाठी खाजगी नेटवर्क असणार आहे. हे फीचर तुमच्या क्रोम ब्राउझरच्या होम नेटवर्कचे संरक्षण करेल. जो तुमचा वैयक्तिक डेटाची सुरक्षितता राखेल. याच्या सिक्युरिटी फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याच्या मदतीने तुम्ही डेटा अधिक पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित ठेवू शकाल.

1. नवीन फीचर होम नेटवर्क सुरक्षित ठेवेल

गुगलचे हे नवीन फीचर युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. हे सुरक्षा वैशिष्ट्य XDA डेव्लपर्सने आणले आहे. तुम्ही वेबसाइट ब्राउस केल्यास हे फीचर वेबसाइटवर (Website) मिळालेली नॅव्हिगेशन विनंत्या ब्लॉक करते. यामुळे होम नेटवर्क पूर्णपणे सुरक्षित राहाणार

गुगल क्रोमचे हे वैशिष्ट्य चेक पॉईंटसारखे काम करते. ज्यामुळे डेटा आणि सुरक्षिततेला हानी पोहचवणाऱ्या कोणत्याही वेबसाइटला ते प्रतिबंधित करते. प्रायव्हेट नेटवर्क ऍक्सेस वैशिष्ट्य कोणत्याही वेबसाइटवरुन मिळालेल्या मूळ बिंदू तपासते. त्यानंतर सुरक्षित स्त्रोत आहे की, नाही याबद्दल माहिती घेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT