प्रवासाचा सोबती म्हणून गुगल मॅपला ओळखले जाते. कोणत्याही ठिकाणी पोहोचयचे असेल तर गुगल मॅपवर पत्ता टाकला तर ट्राफिकपासून ते आपण किती वेळात अंतर पार करु शकतो. याविषयी संपूर्ण माहिती गुगल मॅप देत असते.
आजकाल प्रत्येकजण गुगल (Google) मॅपचा वापर करताना पाहायला मिळत आहे. गुगल मॅप तुम्हाला रस्ता दाखवण्याचे काम करते. परंतु, अनेकवेळा तुम्ही माहित नसणाऱ्या ठिकाणी प्रवास करता, त्या ठिकाणी जर तुम्हाला कोणतेही हॉटेल, सीएनजी पेट्रोल दिसले की, नक्कीच लोकेशन सेव्ह करा. ज्यामुळे या ठिकाणी पुन्हा जायची वेळ आली तर तुम्ही रस्ता चुकणार नाही.
1. गुगल मॅपवर लोकेशन कसे सेव्ह कराल?
सर्वात आधी तुम्हाला गुगल मॅप ओपन करावे लागेल. यानंतर तुमच्या ब्राउझरवर maps.google.com वर टॅप करा.
यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी ज्याचे आहे त्यावर क्लिक करा.
त्यानंतर एक पॉप अप विंडो दिसेल. ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणाची माहिती मिळेल.
नंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा. सेव्ह बटणाच्या पुढे अॅड्रेस पॉपअप विंडो दिसेल.
त्यात तुम्हाला मेनू दिसेल. ज्यामध्ये तुम्हाला विचारले जाईल की, कोणती जागा सेव्ह करावी.
तुम्ही नवीन यादी तयार करु शकता किंवा जुन्या सेव्ह लिस्टमध्ये अॅड करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.