Google Password Protection, Google Chrome Saam Tv
लाईफस्टाईल

Google Chrome ची ही सेंटिग आजच बदला, अन्यथा पासवर्ड होईल लीक

Google Password Protection : सध्या इंटनेटच्या जगात आपल्यापैकी अनेकजण इंटरनेट ब्राउजरचा वापर करतात. क्रोमचा वापर करुन आपण जगभरातील माहिती सहज मिळवू शकतो. आपण अॅड्रेस बारमध्ये URL किंवा कीवर्ड टाकून आपल्याला पाहिजे ते शोधू शकतो.

कोमल दामुद्रे

Google Chrome Hidden Setting :

सध्या इंटनेटच्या जगात आपल्यापैकी अनेकजण इंटरनेट ब्राउजरचा वापर करतात. क्रोमचा वापर करुन आपण जगभरातील माहिती सहज मिळवू शकतो. आपण अॅड्रेस बारमध्ये URL किंवा कीवर्ड टाकून आपल्याला पाहिजे ते शोधू शकतो.

याचा वापर करुन आपण फोटो, डिव्हाइस फोटो, कागदपत्रे आणि फाइल्स सारख्या गोष्टी डाउनलोड करु शकता. परंतु, बरेचदा आपण फोटो किंवा व्हिडीओ डाउनलोड करताना अशा अनेक साइट्स ओपन करतो ज्यामुळे फोनमध्ये (Phone) व्हायरस शिरतो.

हॅकिंगच्या (Hacked) वाढत्या समस्यांमुळे हा व्हायरस आपल्या फोनची प्रायव्हसी ओपन करतो ज्यामुळे पासवर्ड लीक होण्याचा धोका नेहमी असतो. ब्राउझर वापरताना आपल्याला भीती वाटते. परंतु, आम्ही तुम्हाला क्रोमची अशी एक सेंटिग सांगणार आहोत ज्याचा वापर करुन तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकतो.

1. ब्राउझिंग सेंटिग

Enhanced Safe Browsing या सेटिंग्ज फोन किंवा लॅपटॉपमधील व्हायरस तसेच धोकादायक वेबसाइट, डाउनलोड करण्यापासून रोखता. त्यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहिल. ही सेंटिग ऑन केल्यावर स्वतंत्रपणे काम करते. त्यासाठी तुम्हाला या साइटला साइन करावे लागेल त्यामुळे गुगल (google) क्रोम आणि जीमेलचे पासवर्ड सुरक्षित राहील.

2. सेटिंग ऑन कसे कराल?

  • सर्वात आधी गुगल क्रोमचा ब्राउझर ओपन करा.

  • यानंतर डाव्या बाजूला तीन डॉटचा पर्यायावर क्लिक करा.

  • सेटिंगचा पर्याय मिळाल्यानंतर Privacy and Security निवडा

  • त्यानंतर शेवटून दुसरा पर्याय निवडा.

  • तुम्हाला येथे अनेक पर्याय पाहायला मिळतील. त्यानंतर Enhanced Safe Browsing क्लिक करा. त्यामुळे तुमचे डिव्हाइस अधिक चांगला ब्राउझिंग देईल.

4. सुरक्षा तपासणी

तुम्ही प्रायव्हसी अँड सिक्युरिटी ऑप्शनमधून सेफ्टी चेक ऑप्शन वापरुन तुम्ही तुमचे खाते सुरक्षित ठेवू शकता. तसेच ब्राउसरवरुन तुम्हाला पासवर्डची माहिती मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT