Travel Knowledge
Travel Knowledge Saam Tv
लाईफस्टाईल

Travel Knowledge : गोवा फिरायला जाताय? जाणून घ्या तेथील फेस्टिव्हलबद्दल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Traveling Knowledge : पर्यटकांसाठी गोवा हे एक आकर्षक ठिकाण आहे. प्रत्येक सीझनमध्ये अनेक व्यक्ती गोव्याला एक तरी ट्रिप नक्की काढतात. अशातच फेब्रुवारीचा महिना गोवा फिरण्यासाठीचा उत्तम महिना मानला जातो. या दिवसांमध्ये गोव्याचे वातावरण अतिशय आनंददायी आणि रोमँटिक असते.

अशातच दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये गोवा (Goa) कार्निवल फेस्टिवल आयोजित केला जातो. यावर्षी गोवा कार्निवल फेस्टिवलचे आयोजन फेब्रुवारीत होते. तर तुम्ही सुद्धा गोव्याला जाण्यासाठी प्लॅनिंग करत असाल तर, जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी.

कधी असतो गोवा कार्निवल फेस्टिवल?

प्रत्येक वर्षी गोवा कार्निवल फेस्टिवलचे (Festival) आयोजन फेब्रुवारी महिन्यामध्ये केले जाते. यावर्षी गोवा कार्निवल फेस्टिवल फेब्रुवारीत सुरू होत आहे. हे गोवा कार्निवल फेस्टिवल फक्त चार दिवसांचा असतो.

कुठे असतो हा फेस्टिवल?

गोवा कार्निवल फेस्टिवलचे आयोजन गोव्यामधील चार सुंदर शहरांमध्ये, पंजिम, मापुसा, मडगाव आणि वास्को या शहरांमध्ये केले जाणार आहे. यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे. पांजिम गोव्याची राजधानी आहे.

जर तुम्ही आतापर्यंत गोवा कार्निवल फेस्टिवलमध्ये शामिल झाले नसेल तर, एकदा तुम्ही जरूर या फेस्टिवलमध्ये जायला हवे. या दिवसांमध्ये गोव्यामध्ये एखाद्या सणासारखा माहोल असतो. दर्या किनारीवर संगीत आणि नृत्य पहायला मिळते.

फ्री आहे एन्ट्री -

गोवा कार्निवल फेस्टिवलमध्ये एन्ट्री करण्यासाठी एन्ट्री फी मोजावी लागत नाही. परंतु रेड अंड ब्लॅक डान्ससाठी तुम्हाला शंभर रुपये एवढी फी मोजावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डान्स करू शकता. मोठ्या संख्येने अनेक पर्यटक गोवा कार्निवल फेस्टिवलमध्ये भाग घेण्यासाठी येतात. या दिवसांमध्ये तुम्ही स्थानिक जायकांचा आनंद घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT