How to improve immunity, Immunity Boosting Foods ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुलांच्या लंच बॉक्समध्ये हे पदार्थ द्या; प्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांना लंच बॉक्समध्ये हे पदार्थ द्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : कोरोनाचे (Corona) प्रमाण सध्या पुन्हा वाढत आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्याला अधिक सक्रीय असणे गरजेचे आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्याला बदल्यात हव्या.

हे देखील पहा -

पावसाळा (Monsoon) सुरू झाल्यामुळे सर्दी व खोकल्याचे प्रमाण वाढत आहे त्यात अनेक आजारांना बळी पडावे लागते. पावसाळा हा साथीचा रोग असल्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणे अधिक गरजेचे आहे. आपल्या आहारात आपण असे काही पदार्थ आपण आवर्जून खायला हवे ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढू शकते. सध्या मुलं शाळेत जात असल्यामुळे त्यांच्या लंच बॉक्समध्ये आपण काही आरोग्यदायी पदार्थ देऊ शकतो ज्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती वाढेल. (Immunity Boosting Foods)

हे पदार्थ मुलांना लंच बॉक्समध्ये द्या-

१. आपण मुलांना डाळ, भात व हिरव्या भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करायला हवे. मुले जर हिरव्या भाज्या खात नसतील तर त्यांना सलाद किंवा सॅण्डविच बनवून त्यांना टिफिन द्या.

२. मुलांना टिफिन बॉक्समध्ये स्नॅक्स म्हणून आपण मखाने, मुंगफली आणि चणे आपण देऊ शकतो. हे सगळे पदार्थ शरीरासाठी अधिक लाभदायक आहे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल.

३. काही वेळेस मुलांना दही दिल्यामुळे सर्दी-खोकला होतो त्यामुळे आपण आहारात आपण लस्सी किंवा ताक देऊ शकतो. तसेच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते.

४. मुलांना पाण्याव्यतिरिक्त त्याच्या आहारात काही द्रवपदार्थांचा समावेश करा. नारळ पाणी, ज्यूस किंवा एनर्जी बार सारखे पदार्थ मुलांच्या लंच बॉक्समध्ये द्या. त्यामुळे मुलांना लो फिल होणार नाही.

५. मुलांना दररोज भाजी चपाती नसेल आवडत तर सगळ्या भाज्या घालून त्यांना खिचडी मुलांना आपण देऊ शकतो.

हे पदार्थ आपण मुलांना खाऊ घालू शकतो. तसेच मुलांना डायफ्रूटसुध्दा नियमित द्या त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढू शकते.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT