Health Care Tips
Health Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Care Tips : कोलेस्ट्रॉल, हाय बीपीपासून मिळेल आराम फक्त हा चहा प्या!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Health Tips : ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल ही आजच्या लाइफस्टाइलमधली सर्वात मोठी समस्या आहे. कोलेस्ट्रॉल रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होऊ लागतो. ज्यामुळे हाय बीपीची समस्या उदभवते. डब्ल्यूएचओनुसार जगभरातील 1.28 अरब व्यक्तींना हाय बीपीचा त्रास आहे.

परंतु दुर्भाग्यामुळे यामधील 46 टक्के व्यक्तींना हे माहीत नाही आहे की, त्यांना ब्लड (Blood) प्रेशर हा आजार आहे. अशातच आपण लाईफस्टाईल आणि खानपणाच्या पद्धतींमध्ये बदल केला तर, हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहू शकते. एका अध्ययनानुसार लेमन ग्रास टी ब्लड प्रेशर आणि कॉलेस्ट्रॉलच्या समस्येपासून मुक्ती देते.

लेमन ग्रासच्या चहाला सिट्रोनेला देखील म्हटले जाते. या चहामधून चांगला सुगंध येतो. या ग्रासपासून अनेक प्रकारचे परफ्यूम देखील बनवले जातात. सोबतच रूम फ्रेशनरमध्ये देखील लेमन ग्रासचा वापर केला जातो. याचा सुगंध स्ट्रेसला कमी करतो आणि मुड चांगला बनवण्यासाठी मदत करतो.

लेमन ग्रास दिसायला साध्या गवताप्रमाणे दिसते. परंतु ही अत्यंत औषधी गुणांनी भरपूर असते. लेमन ग्रासचा चहा वजन कमी करण्यासोबत अनेक आजारांवर (Disease) रामबाण उपाय ठरू शकते. याच्या सेवनाने सर्दी, खोकला, ॲनिमिया आणि डोकेदुखी या समस्यांपासून सुटकारा मिळतो. सोबतच या चहाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

लेमन ग्रासमध्ये कॅन्सररोधी गुण -

हेल्पलाइननुसार लेमन ग्रास एंटीबॅक्टरियल, एंटीफंगल, अँटीकॅन्सर, अँटीडिप्रेसेंट या गुणांनी भरपूर असते. यामध्ये विटामिन ए, फॉलिक ऍसिड, झिंक, कॉपर, आयरन,पोटॅशियम, फॉस्फरस कॅल्शियम आणि मॅग्नीजसारखे तत्त्वे उपलब्ध असतात.

जे आपल्या शरीराचे संपूर्ण स्वास्थ्य सुधरवण्यासाठी मदत करतात. लेमन ग्रास पचनसंस्थेला ठीक करण्याचे काम करते. लेमन ग्रास चहाचे सेवन केल्याने उल्टी, जूलाब आणि पोट दुखी अशा समस्यांपासून मिळतो. या चहाचे सेवन केल्याने गॅस्ट्रिकची समस्या दूर होते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर -

लेमन ग्रास चहाचे सेवन केल्याने तुमचे वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. सोबतच या चहाच्या सेवनाने तुमचे मेटाबोलिझम सुदृढ राहते. या चहाचे सेवन केल्याने फॅट बर्न होण्यास मदत होते. दूध, साखर आणि चहा पत्तीच्या चहाऐवजी तुम्ही लेमन ग्रासच्या चहाचे सेवण करून तुमच्या शरीराला फायदे करून घेऊ शकता.

कोलेस्ट्रॉलपासून आराम मिळेल -

हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची जोखीम वाढते. जर्नल ऑफ ऍडव्हान्स फर्मास्युटिकल टेक्नॉलॉजी अँड रीसर्चमध्ये असे कळाले आहे की, लेमन ग्रासच्या चहा पासून बनलेले तेल कोलेस्ट्रॉलला अगदी सहजरीत्या कमी करू शकते.

2011 च्या एका अन्य रीसर्चमधून असे समोर आले होते की, दररोज शंभर मिलिग्रॅम लिमन ग्रास इसेन्शियल ओईलचा वापर केल्याने कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नष्ट होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

SCROLL FOR NEXT