Health Tips : उन्हाळ्यातील अनेक आजारांवर फायदेशीर ठरेल आलं व गुळाचा लाडू!

Health Care : कडाक्याची थंडी सध्या वसरली आहे. अशातच वातावरणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळत आहे.
Health Tips
Health Tips Saam Tv

Health Care Tips : कडाक्याची थंडी सध्या वसरली आहे. अशातच वातावरणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळत आहे. थंडीही वाजत आहे आणि गरम देखील होत आहे. अशा वातावरणामुळे अनेकांचे स्वास्थ्य खराब होत चालले आहे.

वातावरण बदलल्यामुळे अनेक आजारांचे (Disease) संक्रमण देखील वाढत जाते. अशावेळी हे सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे की, तुमचे स्वास्थ्य ठीक आहे की नाही. अशा बदलत्या वातावरणामध्ये सीजनल आणि लोकल गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय तुम्ही ठीक होत नसेल तर, आयुर्वेदामध्ये यावर देखील उपाय आहे.

बदलत्या वातावरणामुळे (Weather) तुम्हाला सर्दी आणि खोकला अशा प्रकारच्या समस्या झाल्या असतील तर, अशा प्रकारचे लाडू घरच्या घरी बनवून त्याचे सेवन करा. या घरगुती रेमेडीमुळे तुमचे आरोग्य सुधारेल.

Health Tips
Health Tips : संध्याकाळी चूकूनही खाऊ नका 'ही' फळे, अन्यथा आमंत्रण द्याल अनेक आजारांना !

आता या बदलत्या वातावरणामुळे वृद्ध व्यक्तींपासून ते लहान मुलांपर्यंत प्रत्येकाला एलर्जी, सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात.

लाडू बनवण्याची साहित्य -

गुळ, सुकी अदरक पावडर, शुद्ध गाईचे तूप

Health Tips
Health Tips : बाजरी आणि ज्वारीची भाकरी का आरोग्यासाठी उत्तम?

बनवण्याची पद्धत -

तिन्ही सामग्रीच्या मदतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्या.

या लाडूचे सेवन कोणी केले पाहिजे -

  • या लाडूचे सेवन सर्दी, खोकला, ताप येणाऱ्या व्यक्तीने करावे.

  • या लाडूचे सेवन केल्याने संक्रमण थांबते आणि सर्दी, खोकला, ताप येणे बंद होते.

  • तुमच्या पोटामध्ये जळजळ होत असेल तर या लाडूचे सेवन केल्याने ती जळजळ थांबते.

  • जर तुम्ही स्वतःला कमजोर समजत असाल आणि शरीरातील ऊर्जा कमी होत आहे असं वाटत असेल, तर तुम्ही या लाडूंचे सेवन करू शकता.

  • विशेषतज्ज्ञ सांगतात की गुळ आणि सुंठ पावडर ही थंडीपासून लढण्यासाठी चांगली असते. परंतु तूप प्राकृतिक रूपामध्ये थंड असते, तर तुपाचे सेवन करण्यापासून अशा व्यक्तीने वाचले पाहिजे ज्या व्यक्तीला दीर्घ काळापासून सर्दीची समस्या आहे. कारण तूप हे थंड असते आणि तुपाचे सेवन केल्याने शरीरामधील थंडाई वाढू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com