Gastrointestinal Disease, Gastrointestinal Causes Saam Tv
लाईफस्टाईल

Gastrointestinal Disease : गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कसा होतो? जाणून घ्या डॉक्टरांकडून सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gastrointestinal Symptoms :

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधीत समस्या खूप सामान्य आहेत. ही समस्या सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकते. सतत आंबट ढेकर, ऍसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ: यामध्ये छाती किंवा घशात जळजळ होणे. ही या समस्येची साधारण: लक्षणे दिसून येतात. तसेच काही प्रकरणांमध्ये पोटातून (Stomach) आवाज किंवा दम्यासारखी लक्षणे (Symptoms) दिसून येतात.

याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे मुंबईतील अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्सच्या डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी त्या सध्या सल्लागार बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन, मेटाहेल- लॅप्रोस्कोपी आणि बॅरियाट्रिक सर्जरी सेंटर मध्ये काम करतात.

1. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कसा होतो?

  • पोटफुगणे, गॅसेस : ही एक अतिशय आजाराबाबत (Disease) सामान्य तक्रार आहे आणि त्यामुळे अस्वस्थता, पोट फुगल्यासारखे वाटते.

  • मळमळ, उलट्या आणि अतिसार : संसर्ग किंवा अपचनानंतर हा परिणाम होऊ शकतो आणि बहुतेक वेळा यात सैलसर मल विसर्जन(जुलाब) आणि पोट खराब होते.

  • ओटीपोटात दुखणे: हलक्या वेदनांपासून ते तीव्र वेदना जाणवतात.

  • कोलायटिस आणि अपेंडिसायटिस: कोलन किंवा अपेंडिक्सची जळजळ, वेदना आणि पचनसंस्थेमध्ये अडथळा आणतो.

  • अल्सर-संबंधित समस्या: गॅस्ट्रिक अल्सर आणि पेप्टिक अल्सर ज्यामुळे अॅसिडिटी, ओटीपोटात दुखणे आणि तीव्र अस्वस्थता जाणवते. गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे अल्सरला छिद्र पडू शकतात ज्यामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

  • गॅलस्टोन डिसीज: यात पित्ताशयामध्ये खडे तयार होतात, ज्यामुळे वेदना आणि पचन समस्या उद्भवतात.

  • हर्निया: कमकुवत स्नायूंद्वारे अवयवांना फुगवटा, परिणामी अस्वस्थता आणि गुंतागुंत.

  • बद्धकोष्ठता: मल विसर्जनात अडचण, अनेकदा कठीण मल आणि दररोज मलविसर्जन न होणे.

  • मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला: गुदद्वाराच्या क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या या परिस्थिती, ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचालीदरम्यान वेदना आणि अस्वस्थता जाणवते.

2.लक्षणे

या जठरोगविषयक/पाचन समस्या विविध लक्षणांमधून दिसून येऊ शकतात जसे की सूज येणे, गॅस, ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि बद्धकोष्ठता. सतत किंवा अस्वस्थ करणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये आणि मूळ कारण ओळखण्यासाठी वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.

3. निदान चाचण्या

डॉक्टर निदानात मदत करण्यासाठी संपूर्ण रक्त गणना, यकृत कार्य चाचणी, मूत्र आणि मल विश्लेषण, पोटाचा अल्ट्रासाऊंड, युजीआय एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी किंवा इतर इमेजिंग स्टडी यासारख्या निदान चाचण्यांची शिफारस करतात. चाचण्यांचे प्रकार रुग्णानुसार बदलू शकतात.

4. उपचार

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांवर उपचार करण्याचा दृष्टीकोन विशिष्ट स्थितीनुसार बदलतो आणि त्यामध्ये औषधे, आहारातील बदल, जीवनशैलीतील बदल आणि कधीकधी शस्त्रक्रियेस्रख्या पर्यायाचा समावेश असू शकतो. संतुलित आहार राखणे, हायड्रेटेड राहणे, नियमित शारीरिक हालचाली करणे आणि तणावाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.

भारतीय आहारात मसाले, तेल आणि कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते. हे कधीकधी अॅसिडिटी, गोळा येणे आणि अपचन यांसारख्या पाचन समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. यासाठी मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ आणि अनियमित जेवणाच्या वेळा टाळणे महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त अस्वच्छ, उघड्यावरचे अन्नपदार्थांचे सेवन टाळा. पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी रोजचा व्यायाम करणे फायदेशीर ठरते.

लक्षणे कायम राहिल्यास, उपायांसाठी सोशल मिडीया सारख्या स्रोतांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घेणे योग्य राहिल. योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचार मिळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला फायदेशीर ठरेल.

सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, त्यांची लक्षणे आणि उपचार पर्याय समजून घेऊन पचनाच्या आरोग्य चांगले राखता येऊ शकते. वेळीच उपचार, योग्य निदान आणि आरोग्यदायी सवयींचा अवलंब केल्याने जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारू शकते. आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी तुमचे पचन आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे हे विसरु नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT