Turmeric Milk : या लोकांनी चुकूनही पिऊ नका हळदीचे दूध, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

कोमल दामुद्रे

हळदी

हळदीचे दूध हे आयुर्वेदात गुणकारी मानले आहे. याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

हळदीचे फायदे

हळदीचे दूध प्यायल्याने जखम, सूज आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारापासून आराम मिळतो.

या लोकांनी सेवन करु नका

हळदीचे दूध रात्री प्यायल्याने शांत झोप लागते. परंतु, काही लोकांनी चुकूनही याचे सेवन करु नये.

गरोदर महिला

गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिऊ नये कारण हळदी ही उष्ण असते. याचे सेवन केल्याने रक्तस्त्राव होऊ शकतो.

किडनीचे रुग्ण

किडनीच्या रुग्णांनी हळदीच्या दूधाचे सेवन करु नये. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.

अ‍ॅलर्जीचा त्रास

ज्यांना अ‍ॅलर्जीचा त्रास आहे त्यांनी हळदीचे दूध पिऊ नये. यामुळे ही समस्या अधिक वाढते.

अशक्तपणा

हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील लोह शोषले जात नाही. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढत नाही. अशक्तपणा येतो.

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Next : उन्हाळ्यात त्वचेला टॅनिंग होण्यापासून कसे वाचवाल?

Skin Care Tips, Summer Skin care | Saam Tv