Ganpati Visarjan 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Ganpati Visarjan : गणपती बाप्पाचे विसर्जन का करतात? त्यामागची कथा जाणून घ्या

Ganpati Visarjan : राज्यात आज गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ganpati Visarjan 2023

राज्यात आज गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात होत आहे. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर भरलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप दिला जात आहे. बाप्पाच्या विसर्जन करण्यामागे एक कथा आहे. ही कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१४ विद्या आणि ६४ कलांचा दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाची सर्वजण पूजा करतात. गणेशोत्सवाच्या काळात १० दिवस बाप्पा भाविकांच्या घरी विराजमान होतो. बाप्पाच्या आगमनाची जशी कथा आहे तशीच बाप्पाच्या विसर्जनाचीही एक कथा आहे.

गणपती विसर्जनाची कथा

महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रथांची रचना करण्यास सुरुवात केली. यामध्ये महाभारताचा मजकूर लिहिण्यासाठी त्यांनी गणपतीला सांगितले. त्यानंतर महाभारताच्या लिखाणाचे काम सुरू झाले. महर्षी व्यासांच्या सांगण्यावरुन गणपतीने १० दिवस रात्रंदिवस हे काम केलं.

ही कथा सांगून झाल्यावर जेव्हा महर्षी व्यास यांनी डोळे उघडले तेव्हा गणपतीच्या शरीराचं तापमान खूप वाढले होते. त्यानंतर गणपतीचे तापमान कमी करण्यासाठी महर्षी व्यास यांनी एका तलावात त्याला अंघोळ घातली. तेव्हापासून गणपती बाप्पाचे विसर्जनाची प्रथा सुरू झाली.

गणपती बाप्पाने महाभारताचे लिखाण करण्याची सुरुवात भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी केली होती. अनंत चतुर्थीच्या दिवशी हे काम संपले तेव्हापासून दहा दिवस हा सण साजरा केला जातो.

दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत आज बाप्पाचे विसर्जन होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या थाटामाटात, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT