Gulgule Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Gulgule Recipe: टम्म फुगलेले गव्हाच्या पिठातले सॉफ्ट आणि कुरकुरीत गुलगुले; कसे बनवायचे, वाचा रेसिपी

Gulgule Recipe In Marathi : सिंपल आणि सोप्प्या पद्धतीने आज घरी बनवा गोड, मऊ आणि कुरकुरीत असे गुलगुले. कसे बनवायचे नोट करा रेसिपी.

Ruchika Jadhav

जेवणात तिखट, गोड आणि चमचमीत असे सर्वच पदार्थ प्रत्येकाला खावे वाटतात. अशात सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे दररोज घरी काही ना काही गोड पदार्थ बनवला जातो. बाप्पा घरी असताना दररोज काय गोड बनवावे असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट आणि खास रेसिपी शोधली आहे.

आज आपण गव्हाच्या पिठापासून तयार होणारी एक गोड रेसिपी बनवणार आहोत. गव्हाच्या पिठाचे गुलगुले घरच्याघरी कसे बनवायचे याची माहिती जाणून घेऊ. ही एकदम सोप्पी आणि सिंपल रेसिपी आहे. नवीन स्वयंपाक बनवणाऱ्या मुलींना देखील ही रेसिपी सहज आणि सिंपल पद्धतीने बनवता येईल.

साहित्य

गव्हाचे पीठ

गूळ

जायफळ

वेलची

तेल

कृती

सर्वात आधी एका टोपात पाणी घ्या. त्यानंतर गूळ किसून घ्या आणि पाण्यात मिक्स करा. पुढे या पाण्यात बसेल तितके गव्हाचे पीठ मिक्स करा. गव्हाचे पीठ मिक्स करत असताना त्यात जायफळ आणि वेलची सुद्धा मिक्स करा. पीठ भिजवत असताना ते जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. पीठ मऊ आणि सैल राहील या पद्धतीने भिजवून घ्या.

हा पदार्थ गोड असला तरी देखील त्यात चवीसाठी थोडे मीठ मिक्स कसा. मीठ मिक्स केल्यावर पुढे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या. कारण जास्त गरम तेलात गुलगुले करपण्याची शक्यता असते.

चमचा किंवा हाताच्या सहाय्याने एक एक गुलगुले तेलात टाका. त्यानंतर याला गोल्डन भरून रंग येईपर्यंत छान तळून घ्या. तयार झाले झटपट गुलगुले. तुम्ही बाप्पा समोर देखील हे गुलगुले नैवेद्याच्या स्वरूपात ठेवू शकता. घरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या पद्धतीने बनवलेले गुलगुले फार आवडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT