Shreya Maskar
रव्यामध्ये तंतुमय पदार्थ आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने, तो वजन कमी करण्यास मदत करतो. कारण यामुळे पोट भरल्याची जाणीव होते, भूक कमी लागते आणि अतिखाणे टाळले जाते.
टोमॅटो रवा उपमा बनवण्यासाठी तूप, टोमॅटो, रवा, जिरे, हिंग, सुकी लाल मिरची, लाल तिखट, कांदा, टोमॅटो, हिरवी ढोबळी मिरची, आले, कढीपत्ता, पाणी, मीठ इत्यादी साहित्य लागते.
टोमॅटो रवा उपमा बनवण्यासाठी रवा किंचित कुरकुरीत आणि सुगंधित होईपर्यंत एका पॅनमध्ये भाजून घ्या. त्यानंतर लाल टोमॅटो बारीक चिरा.
दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर सुक्या लाल मिरच्या आणि हिंग घाला. दोन मिनिटे चांगले परतून घ्या.
आता मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा घालून गोल्डन फ्राय करा. त्यानंतर हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि आले घाला. मिश्रण चांगले मिक्स करा.
मिश्रणात लाल तिखट आणि हळद घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मध्यम आचेवर ढवळा. आता यात परतलेला रवा मिक्स करा.
१ कप पाणी आणि मीठ घाला आणि चांगली उकळी काढून घ्या. रवा सतत ढवळत राहा, जेणेकरून ते चिकटणार नाही. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
पॅनवर झाकण ठेवून दोन मिनिटे उपमा वाफ येऊ द्या. अशाप्रकारे हेल्दी रवा-टोमॅटो उपमा तयार आहे. टोमॅटो रवा उपमा खाताना त्यावर हिरवीगार कोथिंबीर टाका.