Shreya Maskar
वजन झटपट कमी करण्यासाठी मखाना करी हा बेस्ट ऑप्शन आहे. मखनामधील पोषक घटक झटपट वजन कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जेवणात याचा नक्की समावेश करा.
मखना करी बनवण्यासाठी मखाना, जिरे, टोमॅटो, लसूण, लाल मिरची पावडर, मीठ, वनस्पती तेल, काजू, कांदा, आले, हळद, धणे पूड, क्रीम, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
मखाना करी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मखाने घालून चांगले परतून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात काजू हलके गोल्डन फ्राय करा.
ब्लेंडरमध्ये चिरलेले टोमॅटो, आले, लसूण आणि भाजलेले काजू घालून त्याची गुळगुळीत पेस्ट करा. पेस्ट जास्त पातळ आणि घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
एका पॅनमध्ये तेल टाकून जिरे घालून तडतडू द्या. त्यात चिरलेला कांदा परता. यात टोमॅटो-काजू पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट आणि धणे पूड घाला.
त्यात १ कप पाणी घालून उकळी काढा. पॅनमध्ये भाजलेले मखाने आणि फ्रेश क्रीम घालून चांगले मिक्स करा. मिश्रण ४-५ मिनिटे शिजू द्या आणि नंतर गॅस बंद करा. अशाप्रकारे मखाना करी तयार झाली.
मखानामध्ये कमी कॅलरीज, कमी चरबी आणि उच्च फायबर असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. तसेच मखाना प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे.
मखाना चयापचय सुधारण्यास आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे डाएटमध्ये मखान्याचा नक्की समावेश करा.