Shreya Maskar
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण जंक फूड खूप खातो, ज्यामुळे वजन वाढते. वाढणारे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही सकाळी नाश्त्याला एक ग्लास पीनट बटर बनाना स्मूदी प्या.
पीनट बटर बनाना स्मूदी बनवण्यासाठी केळी, पीनट बटर, दूध, दही, मध, मीठ, शेंगदाणे इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.
पीनट बटर बनाना स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्लेंडरमध्ये केळी, पीनट बटर, दूध, दही, मध आणि मीठ घालून ड्रिंक बनवा. जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
मिश्रण पिण्यायोग्य गुळगुळीत होईपर्यंत ब्लेंड करा. जेणेकरून खाताना चव आणखी वाढेल. तसेच चांगले पोषण मिळेल.
एका काचेच्या ग्लासात पीनट बटर बनाना स्मूदी ओता. त्यावर शेंगदाण्याचे तुकडे घाला आणि याचा आस्वाद घ्या.
पीनट बटर बनाना स्मूदी अधिक हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही यात ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. यामुळे शरीराला खूप ऊर्जा देखील मिळेल.
केळी योग्य प्रमाणात खाल्ल्यास निरोगी वजन कमी करण्यास खूप फायदेशीर आहेत. यात कमी कॅलरीज असतात. त्यात फायबर असते.
पीनट बटरमध्ये उच्च प्रथिने, फायबर यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. तसेच यात अतिरिक्त कॅलरी नाहीत. स्नायू मजबूत राहतात. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. पीनट बटरचे प्रमाण मर्यादित ठेवा.