Shreya Maskar
तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर रोजच्या चटपटीत पोह्यांना हेल्दी बनवा. डाएट पोहे कसे बनवावे, जाणून घेऊयात.
डाएट पोहे बनवण्यासाठी धणे पूड, लाल तिखट, साखर, लिंबाचा रस, मोड आलेले कडधान्य, वाटाणे, मीठ, तेल, शेंगदाणे, पनीर, मोहरी , कढीपत्ता, कांदा, हळद इत्यादी साहित्य लागते.
डाएट पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात शेंगदाणे हलके तळून बाजूला ठेवा.
आता उरलेल्या तेलात मोहरी आणि कढीपत्ता परतून घ्या. त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालून गोल्डन फ्राय करा.
आता पोह्यांमध्ये मोड आलेले कडधान्य आणि वाटाणे घालून परतून घ्या. बाऊलमधील पोह्यांवर थोडे पाणी शिंपडा म्हणजे ते मऊ होतील.
त्यात साखर घालून ५ मिनिटे शिजवा. आता मऊ झालेला पोहा पॅनमध्ये मिक्स करा. त्यानंतर यात रोस्ट केलेले पनीरचे छोटे तुकडे टाका.
पोहे झाकून २ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. शेवटी त्यावर शेंगदाणे, लिंबाचा रस घालून त्यांचा आस्वाद घ्या.
पनीर प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.पनीरमध्ये हेल्दी फॅट्स आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. कडधान्यांमध्ये कमी कॅलरीज असतात.