Shreya Maskar
बीटरूटमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे आपले वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. यात पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
बीटरूटमध्ये कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असल्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.यामध्ये फॅट नसते, ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
बीटरूटमुळे चयापचय सुधारते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि पोट भरलेले ठेवते, परिणामी अतिरिक्त कॅलरी खाणे टाळले जाते.
बीटरूट पराठा बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, बीट, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, जिरे, मीठ, तेल इत्यादी साहित्य लागते.
बीटरूट पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या ब्लाऊलमध्ये गव्हाचे पीठ, किसलेले बीट, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, मीठ आणि ओवा एकत्र मिक्स करा.
बीट आधीच ओलसर असते, त्यामुळे मऊ पीठ मळण्यासाठी गरज वाटल्यास थोडे थोडे पाणी घाला. यात मसाल्याचे प्रमाण कमी असू दे.
पीठात थोडे तेल टाकून, मळलेले पीठ १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा. त्यानंतर पीठाचे छोटे छोटे गोळे करून चपाती सारखे गोल लाटा.
बीटरूट पराठा गरम तव्यावर एक थेंब तेल टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. जेणेकरून बीटरूट पराठा चांगला फुलेल. त्यानंतर दहीसोबत पराठ्याचा आस्वाद घ्या.