Ganesh Festival Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Festival Recipe : बाप्पासारखी मुलांची बुध्दी तल्लख करायची आहे, बनवा बदामाचा हलवा

बाप्पासाठी बनवा बदामाचा हलवा

कोमल दामुद्रे

Ganesh Festival Recipe : सध्या गौरी-गणपती प्रत्येकाच्या घरात विराजमान झाले आहे. बाप्पाच्या आगमनात आपण सगळ्याप्रकारे भोग ठेवतो. त्यातील एक पदार्थ बदाम.

बदाम खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. बदामाचे सेवन केल्याने त्वचेचे व केसांचे आरोग्य सुधारते. तसेच, यात अनेक पोषक घटक असतात. हे अँटीऑक्सिडंट्स, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द आहे. ते खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि हाडे मजबूत होतात. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. बदामामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्याला (Health) जास्त प्रमाणात फायदा होतो.

आपण सहसा भिजवलेले बदाम खाण्याला पसंती देतो किंवा दुधामध्ये (Milk) त्याची पूड बनवून त्याचे सेवन करतो. चला तर मग जाणून घेऊया बाप्पासाठी बदामाचा हलवा कसा बनवायचा ?

साहित्य -

बदाम - ३०० ग्रॅम

दूध - १०० मिली

तूप - १०० ग्रॅम

साखर - १०० ग्रॅम

चिमूटभर केसर

वेलची पावडर - १ चमचा

कृती -

१. ही स्वादिष्ट रेसिपी बनवण्यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवा. सकाळी बदामाची साल काढा. यानंतर बदाम मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर जारमध्ये २ चमचे दूध घालून घट्ट पेस्ट बनवा. ते चांगले मिसळा.

२. आता कढईत तूप वितळून त्यात बदामाची पेस्ट घाला. नीट ढवळून बदामाची पेस्ट सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्या.

३. आता उरलेले दूध पॅनमध्ये ठेवा आणि नंतर साखर घाला. यानंतर १० मिनिटे शिजवा. नंतर गॅसवरून पॅन काढा आणि त्यावर केशर सोबत वेलची पावडर शिंपडा. अशा प्रकारे स्वादिष्ट बदामाचा हलवा बाप्पाला नैवेद्यात ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

SCROLL FOR NEXT