Why Ganapati Bappa likes Modak? Saam TV
लाईफस्टाईल

Why Ganapati Bappa likes Modak? : गणपती बाप्पाला मोदक सर्वात जास्त का आवडतात? वाचा कारण

Ruchika Jadhav

गणपती बाप्पा आणि मोदक यांचं एक वेगळं आणि अनोखं समीकरण आहे. गणेशाला मोदक फार आवडतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. फक्त गणपती नाही तर त्यांचे वाहन असलेल्या मूषकराजला सुद्धा मोदक प्रचंड आवडतात. प्रसादामध्ये बरेच पदार्थ येतात. मात्र या सर्वांमध्ये गणपतीला फक्त मोदकच का आवडतात? असा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी आलाच असेल.

कारण काय?

गणपती बाप्पाला सर्वाधिक मोदक आवडण्यामागे परशुरामाचा हात आहे, असं म्हटलं जातं. यामगचा एक रंजक किस्सा आहे. त्यातच गणपती बाप्पााल मोदक आवडण्याचे कारण दडले आहे.

रंजक किस्सा

एकदा भगवान शिव आपल्या घरात झोपले होते. त्यावेळी महादेवाला कुणीही त्रास देऊ नये आणि त्यांची झोप मोड होऊ नये, यासाठी गणराया दारावर पहारा देत होता. गणपती दारावर पहारा देत असताना तेथे परशुराम येतो. युद्धात भगवान शिवाने परशुराम यांना दिलेला परशु घेऊन तो येथे आलेला असतो. त्याला भगवान शिवा यांना भेटायचे असेत. त्यांना भेटण्यासाठी तो गणपतीकडे विनंती करतो.

माझं महत्वाचं काम आहे मला आत जाऊद्या, असे सांगतो. मात्र भगवान शिव आतमध्ये झोपलेले असतात. त्यांची झोप मोड होऊ नये म्हणून गणपती परशुरामाला आतमध्ये जाऊ देत नाही. बरीच विनंती केल्यावर परशुरामाला राग अनावर होतो आणि दोघांमध्ये लढाई सुरू होते. या दरम्यान भगवान शिव आवाजाने उठतात आणि दोघांचा वाद थांबवण्यासाठी बाहेर येतात.

मात्र तितक्यात परशुराम त्याच्याकडे असलेल्या परशुने गणरायावर हल्ला करतो. हा परशु गणपतीच्या दातांवर लागतो. त्यामुळे गणेशाचा एक दात तुटतो. दात तुटल्याने पुढे काही दिवस गणपती बाप्पाला कोणतेही पदार्थ खाताना चावण्याचा त्रास होतो. त्यावेळी गणरायाला मोदक दिले जातात. मोदक मऊ असल्याने गणपती तेव्हा मोदक खाऊन घेतात आणि स्वत:चं पोट भरतात. तेव्हापासून गणरायाला मोदक फार आवडू लागले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT