Ganesh Chaturthi 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2023 : श्रीगणेशाला मोदक अतिप्रिय का? जाणून घ्या कारण

Ganesh Festival Date : गणेशोत्सवाचा हा सण १९ सप्टेंबरपासून सुरु होईल. पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाला लाडू, मोदक आणि इतर मिठाई आवडतात.

कोमल दामुद्रे

Why Lord Ganesh Loves Modak :

धार्मिक ग्रंथानुसार, गणेश चतुर्थी हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. लवकरच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या १० दिवसात भक्तगण गणरायाची मनोभावे पूजा अर्चना करतात. यंदा गणेशोत्सवाचा हा सण १९ सप्टेंबरपासून सुरु होईल.

पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाला लाडू, मोदक आणि इतर मिठाई आवडतात. परंतु, गणपतीला मोदकप्रिय म्हणून का ओळखले जाते. या १० दिवसात त्याला 21 मोदक भोग म्हणून का अर्पण केले जातात? गणपतीला मोदक अतिप्रिय का आहेत हे जाणून घेऊया.

1. पौराणिक कथा

हिंदू धर्मग्रंथानुसार, एकदा श्रीगणेश (Ganpati) देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्यासह अनुसूया मातेच्या घरी गेले होते. अनुसयाला वाटले की, श्रीगणेशाला आधी खाऊ घालूयात परंतु, कितीही खाले तरी श्रीगणेशाची भूक काही संपत नव्हती. त्यावेळी गणपतीची भूक भागवण्यासाठी अनुसया मातेने गोडाचा पदार्थ म्हणून मोदक बनवले आणि गणपतीला खाऊ घातले. २१ मोदक खाल्यानंतर गणरायाची भूक शांत झाली तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आहे आणि म्हणूनच त्याला २१ मोदक (Modak) अर्पण करण्याची परंपरा आहे.

आणखी एका आख्यायिकेनुसार एकदा भगवान शंकर निंद्रावस्थेत असताना श्रीगणेश पाहारा देत होते. परशुराम तिथे पोहचल्यावर गणेशांनी त्यांना थांबवले. परशुरामाला राग आला आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये युद्ध सुरु झाले. भगवान शंकराने दिलेल्या परशुने गणेशावर परशुरामांनी हल्ला केला. त्यामुळे त्यांचा दात तुटला. तुटलेल्या दातांमुळे कोणतेही अन्नपदार्थ (Food) खाण्यास त्रास होऊ लागला, तेव्हा त्यांच्यासाठी मोदक बनवण्यात आले. मऊसुत मोदक खाऊन गणरायाचे पोट भरले तेव्हापासून गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT