श्रीगणेशाला बुद्धीचा देवता म्हणून ओळखले जाते. प्रत्येक शुभ कार्यात श्रीगणेशाच्या पूजलं जातं. बुद्धीच्या देवतेचं पूजन केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते असे म्हटले जाते. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. या दिवसात गणेशाची आराधना केली जाते.
श्री गणेशाच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला बुद्धी आणि स्मरणशक्तीचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय इतरही अनेक फायदे आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अनेक मंत्राचा जप केला जातो. त्यापैकी एक वक्रतुंड महाकाय असून या मंत्राच्या उच्चारांने अनेक फायदे होतात. तसेच आर्थिक संकंटापासून देखील दूर राहाता येते. जप कसा कराल जाणून घ्या
1. श्रीगणेश मंत्र
।। वक्रतुंड महाकाया, सूर्यकोटी संप्रभा
देव निर्विघ्नम् कुरु, सर्वकार्येषु सदा ।।
2. मंत्राचा अर्थ
वक्रतुंड महाकाय म्हणजे वक्र सोंड आणि विशाल शरीर, सूर्यकोटी संप्रभा म्हणजे सूर्यासारखे, निर्विघ्नम् कुरु मी देव म्हणजे कोणताही अडथळा (Problem) नसलेला आणि सर्वकार्येषु सर्वदा म्हणजे प्रत्येक कार्य शुभतेने पूर्ण करणारा.
या मंत्राचा अर्थ हे गणेशा (Ganesh) ज्याची सोंड वक्र आहे, ज्याचे शरीर विशाल आहे आणि ज्याचे तेज सूर्यासारखे आहे. सगळी कामे अडथळ्याशिवाय होतील.
हा मंत्र एकमेव असा मंत्र आहे जो कोणत्याही देवतेची पूजा (Puja), विधी, शुभ कार्य इत्यादींमध्ये नेहमी म्हटला जातो.
3. मंत्राचा जप करण्याचे फायदे
धर्मग्रंथानुसार या मंत्राचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही आहे.
या मंत्राचा दररोज फक्त ५ मिनिटे एकाग्रतेने जप केल्यास स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, असा आयुर्वेदात उल्लेख आहे.
आयुर्वेद मानते की या मंत्राची मूळ उर्जा माणसाला मानसिक आजारांपासून वाचवते आणि तणाव, नैराश्य, स्मृतिभ्रंश इत्यादी समस्यांपासून देखील आराम देते.
हा मंत्र भय, शंका, निराशा इत्यादी वाईट विचारांचाही नाश करतो आणि व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये सकारात्मकता वाढवतो. त्याच वेळी, धार्मिक मतानुसार, या मंत्राचा जप केल्याने, भगवान गणेशासोबत, देवी सरस्वतीसारखी वाचा प्राप्त होते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.