कोमल दामुद्रे
आजच्या काळात केस तुटणे, केस गळणे आणि अकाली पांढरे होणे ही सामान्य समस्या बनली आहे.
जर तुम्हीही केसांच्या अशाच समस्यांनी त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
तुमच्या केसांना पुरेसे पोषण मिळावे यासाठी रात्री खोबरेल तेलाने केसांना मसाज करा.दुसऱ्या दिवशी केस धुवा. आठवड्यातून किमान दोनदा हे करा.
कांदा बारीक करून त्याचा रस काढा आणि कापसाच्या साहाय्याने केसांच्या मुळांवर लावा. एक तासानंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा हे करुन पाहा
खोबरेल तेलात कढीपत्ता उकळवा, नंतर ते गाळून टाळूवर लावा. तासाभरानंतर थंड पाण्याने डोके धुवा.
अंड्याचा पांढरा भाग खोबरेल तेलात चांगले मिसळा. हे मिश्रण केसांना लावा आणि तासाभरानंतर केस धुवा. यामुळे केस गळणे मोठ्या प्रमाणात थांबते.
मेथी दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. दह्यात मिसळून डोक्याला लावा, सुकल्यानंतर केस धुवा.
कोरफडीचे जेल काढून केसांना लावा आणि तासाभरानंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा करा.
खोबरेल तेलात आवळा घाला उकळवा, नंतर थंड करा आणि केसांची मालिश करा. तासाभरानंतर केस धुवा.