Ganesh Chaturthi 2022  Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2022 : प्रसादात आलेल्या केळीचा 'या' प्रकारे करा वापर, मुलांसोबत बाप्पादेखील होईल खूश

कोमल दामुद्रे

Ganesh Chaturthi 2022 : गणोशोत्सवात सगळ्यात कमी व सहज पचलं जाणार फळ अर्थात केळी. बाप्पाच्या प्रसादात हमखास केळी वाटली जाते परंतु, केळी हे फळ अधिक काळ टिकत नाही. एका विशिष्ट काळानंतर ते काळे पडते व खराब होते.

केळी (Banana) रक्तदाब व हृदयाचे आरोग्य सुधारण्यास फायदेशीर (Benefits) ठरते. केळे खाल्ल्याने अॅसिडीटी, पित्ताचा त्रास, मळमळ व अल्सर सारख्या आजारावर मात करण्यास मदत होते.

बाप्पाच्या प्रसादात येणाऱ्या केळीला आपल्याला टाकूनही देता येत नाही व खराब झाल्यामुळे ते खाता येत नाही. त्यासाठी आज आपण केळीपासून खास अशी रेसिपी बनवणार आहोत. जाणून घेऊया त्याची रेसिपी

साहित्य:-

केळी -३

बारीक रवा - १ १/२ वाटी

साखर - १ वाटी

तूप - ४ ते ५ चमचे

डेसिकेटेड कोकोनट - १/४

साखर - १/४ वाटी

केशर दूध कोमट - १/२ वाटी

वेलची पूड

खसखस

ड्रायफ्रुट आवडीनुसार

कृती -

१. सर्वप्रथम पिकलेल्या एका केळीची साल काढून घ्या व त्याला चमच्याने चांगले कुस्करून घ्या. नंतर त्यात साखर व डेसिकेटेड कोकोनट घालून चांगले एकजीव करा.

२. त्यानंतर कढई ठेवून त्यात १ चमचा तूप घाला. मंद आचेवर किसमिस, खसखस व मॅश केलेले केळे त्यात घाला व व्यवस्थित रित्या परतवून घ्या. सतत हलवत राहा त्यामुळे मिश्रण घट्ट होईल. त्यानंतर ते एका प्लेट काढून घ्या व थंड करा.

३. वरील आवरणासाठी आपण बारीक रवा मंद गॅसवर भाजून घ्या. रवा चांगला भाजलेल्यानंतर त्यात तूप घाला.

४. त्यानंतर उर्वरित केळीचे साल काढून त्याला मॅश करुन घ्या, त्यात साखर घालून पुन्हा पॅनवर चांगले परतवून घ्या. तयार केलेले मिश्रण भाजलेल्या रव्यात घाला व चांगले परतवून घ्या.

५. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात केशरचे दूध घाला व रवा शिजवून घ्या. यात आवडीनुसार ड्रायफ्रुट्स व वेलची पूड घालून चांगले मिक्स करा. तयार मिश्रणाला पुन्हा एकदा वाफ काढा.

६. तयार केलेले केळ्याचे मिश्रण थंड झाल्यानंतर गोळे करुन घ्या. रव्याचे आवरण तयार केलेल्याचे पारी करुन त्यात गोळे भरा व मोदक तयार करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT