Fridge Tips SaamTv
लाईफस्टाईल

New Year Celebration Tips : बाहेरगावी जाताना फ्रीज सुरू ठेवावा की बंद? कशी घ्याल काळजी, फॉलो करा या टिप्स

Fridge Tips News : नवीन वर्षाच्या आणि ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी अनेकजण बाहेरगावी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. अशावेळी घरातील फ्रीज सुरू ठेवावा की बंद करावा याबद्दल आपला गोंधळ होतो.

Saam Tv

नवीन वर्षाची लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनेक जण बाहेरगावी फिरायला जाण्याचा विचार करत असतात. अशावेळी घरातून बाहेर जाताना घर सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सगळी काळजी घेत असतो. घराची सेफ्टी, घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांची काळजी, इतर इलेक्ट्रिकच्या वस्तूंची काळजी, अगदी स्वयंपाक घरातल्या गॅसची सुरक्षा देखील आपण बाहेरगावी जाताना बघतो.

असे सगळे सुरक्षेचे प्रश्न तपासून बघत असताना किचनमधली महत्वाची वस्तु आपण विसरून जातो. ती म्हणजे फ्रीज. बाहेरगावी जाताना फ्रीजचं काय करावं हे न समजून आपण गोंधळून जातो. खूप दिवसांसाठी गावी किंवा फिरायला जाताना फ्रिज बंद ठेवावा की चालू ठेवावा? असंही प्रश्न अनेकवेळा आपल्याला पडत असतो. बंद केला तर त्यातील पदार्थ खराब होण्याची भिती असते. तर फ्रीज सुरू ठेवला तर वीज बिल अधिक येण्याची शक्यता असते.

अशावेळी मग नक्की करायचं काय? यासाठी आम्ही आज तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे. आपल्या प्रवासाचा कालावधी, फ्रिजमधील अन्नपदार्थ, आणि फ्रिजच्या कार्यक्षमतेवर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन करणं गरजेचं असतं. त्यासाठी काय करता येईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

बाहेरगावी जाण्याचा कालावधी

प्रवासाला जाण्याचा कालावधी काय आहे. हे आधी बघावं. तुम्ही जर 2 ते 3 दिवसांसाठीच बाहेरगावी जाणार असाल तर या काळात फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ ताजे राहू शकतात. त्यासाठी फार काळजी घेण्याची गरज पडत नाही. पण साधारणत: आठवडाभरासाठी तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर अशावेळी दुध, दही, भाज्या, फळे अशा गोष्टी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रीजमध्ये देखील खराब पदार्थांचा वास भरतो. मग फ्रीजमधील खराब होण्यासारखे पदार्थ काढून फ्रीज बंद करून बाहेरगावी जाणं योग्य ठरतं.

फ्रीजची क्षमता तपासून तापमान सेट करा

फ्रिज सध्याच्या काळातील महत्वाची गोष्ट झाली आहे. त्यामुळे फ्रीज व्यवस्थित काम करत आहे का हे सतत तपासलं पाहिजे. तसंच त्याची साफसफाई देखील केली पाहिजे. जेणेकरून त्यातले पदार्थ जास्त काळ टिकण्यास मदत होईल. तर डीप फ्रीजचं तापमान हे ऋतुमानाप्रमाणे बदलत राहिलं पाहिजे. 14 ते 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे तापमान असायला हवं. तर सध्या फ्रीजचं तापमान हे 4 ते 5 डिग्री पर्यंत ठेवावं. काही लोकांना सतत फ्रीजची उघडझाप करण्याची देखील सवय असते. यामुळे त्यात बॅक्टेरिया तयार होऊन त्यात ठेवलेल्या पदार्थांचा आरोग्यावर परिणाम होतो.

Fridge Temp

फ्रीज बंद केल्याने विजेची बचत होते का?

अनेकांना असं वाटतं की अधूनमधून फ्रीज बंद केल्याने वीजेचे बचत होते. पण हा समज पूर्णपणे खोटा व चुकीचा आहे. कारण फ्रीज बंद करुन पुन्हा सुरू केल्यावर त्याचा कॉम्प्रेसर सुरु व्हायला प्रमाणापेक्षा जास्त वीज खर्च होत असते. त्यामुळे थोड्या दिवसांसाठी फिरायला जाताना फ्रीज बंद करून जाण्याची गरज नाही. फक्त फ्रीज स्वच्छ पुसून मग त्यात पदार्थ ठेवावेत. जेणेकरून पदार्थांचा वास त्यात भरणार नाही. तर फ्रीजरमध्ये साठवलेला बर्फ फ्रिज बंद ठेवल्यास वितळण्याची शक्यता असते, त्यामुळे फ्रीजरमधील इतर पदार्थ खराब होऊ शकतात.

फ्रिज बंद ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठरणार असले तरी काहीवेळा फ्रिज जास्त काळ बंद ठेवल्यास त्यातून पाणी गळण्यास किंवा दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. तर फ्रिज चालू ठेवणे सोयीचे ठरेल. अशा वेळी, फ्रिज बंद न करता त्याचे तापमान कमी करा, ज्यामुळे तुम्हाला परत आल्यावर ताजे अन्नपदार्थ मिळतील आणि तुमची सुट्टी देखील तुम्ही नो टेशन एन्जोय करू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT