Blood in Stool saam tv
लाईफस्टाईल

Blood in Stool: वारंवार शौचातून रक्तस्राव होतोय? काय असू शकतात कारणं, दुर्लक्ष करू नका!

Blood in Stool: मुळात स्टूलमध्ये रक्त येण्याची अनेक कारणं असू शकतात. त्याची कारणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी दिसतात. कधीकधी काही सामान्य शारीरिक समस्यांमुळे शौचालयात रक्त येण्याची समस्या असते.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्हालाही गेल्या काही दिवसांपासून शौचातून म्हणजेच स्टूलमधून रक्कस्राव होतोय? मात्र लाजेने तुम्ही डॉक्टरांकडे जात नाही आहात का? असं करू नका, कारण असं करणं तुम्हाला फार महागात पडू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही परिस्थिती दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्याकडे दुर्लक्ष करणंही तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकणार आहे. अनेक वेळा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या समस्यांमुळे स्टूलमध्ये रक्त दिसून येऊ शकतं.

मुळात स्टूलमध्ये रक्त येण्याची अनेक कारणं असू शकतात. त्याची कारणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी दिसतात. कधीकधी काही सामान्य शारीरिक समस्यांमुळे शौचालयात रक्त येण्याची समस्या असते. परंतु काही प्रकरणांमध्ये ते काही गंभीर आजारही असू शकतात.

जेव्हा स्टूलमध्ये रक्त येतं तेव्हा त्याचा रंग कधीकधी काळा होऊ शकतो. जर यावेळी तुमच्या शौचाचा रंगही बदलला असेल तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा. आज आम्ही तुम्हाला काही संभाव्य कारणं सांगणार आहोत जी स्टूलमध्ये रक्त येण्यास कारणीभूत असू शकतात.

शौचादरम्यान रक्तस्राव होण्याची कारणं (causes of blood in stool)

इंफ्लेमेटरी बाउल डिसिज (Inflammatory bowel disease)

कधीकधी आतड्यांसंबंधी समस्येमुळे मलामधून रक्त येऊ शकतं. (रक्तात अक्षरे). इंफ्लेमेटरी बाउल डिसिज होतो जेव्हा पाचन समस्येमध्ये बिघाड होतो. यामुळे स्टूलमध्ये रक्त येऊ शकतं. त्याचप्रमाणे रूग्णाला अतिसाराचा त्रास होऊ शकतो.

पोटात अल्सर (Stomach Ulcer)

पोटात अल्सर झाल्यामुळे तुम्हाला शौचावेळी करताना वेदना जाणवू शकतात. यावेळी अतिसाराचा त्रास होऊ शकतो. पोटातील अल्सरला पेप्टिक अल्सर असेही म्हणतात. जो आतड्यांमधील जखमेमुळे होतो. यावेळी रूग्णाला प्रचंड त्रास होण्याची शक्यता असते. पोटाबरोबरच कधी कधी लहान आतड्यातही होतो.

एनल फिशर (Anal fissure)

एनल फिशर म्हणजे गुदद्वारातील भेग. ज्यामुळे शौचात रक्तस्त्राव होऊ शकतो. अनेक वेळा बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वाराच्या आतील भागात दाब आल्याने ही फिशरची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हाला अशी लक्षणं दिसून येत असतील तर वेळीच डॉक्टरांची मदत घेणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT