Bone cancer symptoms saam tv
लाईफस्टाईल

Bone cancer symptoms : हाडांचा कॅन्सर झाल्यावर शरीरात होतात ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Major changes in body due to bone cancer: हाडांचा कर्करोग हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे, जो हाडांच्या पेशींमध्ये असामान्य वाढ झाल्याने होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागले आहेत. यामध्ये आजकाल कॅन्सरचं प्रमाणंही वाढलंय. लिव्हर, ब्रेस्ट कॅन्सरप्रमाणे आता बोन कॅन्सरच्या रूग्णांचं प्रमाणंही वाढलंय. बोन म्हणजेच हाडांचा कॅन्सरा हा एक धोकादायक आजार आहे. त्याची सुरुवातीची लक्षणं सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हाडांच्या कॅन्सरची काही लक्षणं आहे जी आपण समजून घेतली पाहिजे. ही लक्षणं कोणती आहेत जी शरीरात दिसल्यास तुम्ही लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे ते पाहूयात.

हाता-पायांमध्ये वेदना

हातपायांमध्ये सतत वेदना होणं हे बहुतेकदा चुकीच्या स्थितीत राहणं, स्नायूंवर जास्त दबाव असणं आणि चुकीच्या स्थितीत झोपणं याच्याशी संबंधित आहे. मात्र अनेकदा शरीरातील एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण देखील असू शकतं. यामधील वेदना तीव्र नसतात. ज्या हाडात ट्यूमर तयार होत आहे त्या हाडात वेदना जाणवू शकतात.

गाठ किंवा सूज

शरीराच्या कोणत्याही भागात गाठ किंवा सूज दिसून येणं हे देखील या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ही गाठ एखादी किरकोळ दुखापतीसारखी किंवा एखाद्या किड्याने चावा घेतला असेल अशी दिसू शकते. परंतु जर त्यात वेदना होत नसतील तर सावधगिरी बाळगली पाहिजे.

फ्रॅक्चर

हाडांचं फ्रॅक्चर बहुतेकदा कोणत्याही वयात होऊ शकतं. हे बहुतेकदा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे किंवा दुखापतीमुळे होते. परंतु जर वारंवार फ्रॅक्चर होत असेल, किरकोळ दुखापतींमुळे हाडांना दुखापत होत असेल तर शरीरात विकसित होणाऱ्या धोकादायक आजाराचे लक्षण असू शकते.

थकवा

शरीरातील थकवा हा बहुतेकदा जास्त कामाचा ताण, झोपेचा अभाव यांच्याशी संबंधित असतो. परंतु सामान्य परिस्थितीत हा थकवा विश्रांतीने निघून जातो. हाडांच्या कॅन्सरच्या बाबतीत, विश्रांतीनंतरही या प्रकारचा थकवा कमी होत नाही. यामध्ये कॅन्सर हाडांच्या मज्जावर परिणाम करतो, जिथे रक्त पेशी तयार होतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT