चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Eknath Shinde Reaction On Youth Congress Protest In Delhi: दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या एआय समिटदरम्यान युवक काँग्रेसच्या आंदोलनावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. ‘चड्डी बनियान गँग’ असा टोला लगावत काँग्रेसवर निशाणा साधला.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र विरोधकांनी यावर बहिष्कार टाकला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. यानंतर पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. दिल्ली येथील भारत मंडपंमध्ये AI समिट या कार्यक्रमात युवक काँग्रेसने शर्ट काढून मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली आणि देशात काँग्रेस विरुद्ध भाजप हा संघर्ष पेटला. आता यावरच एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, दिल्लीमध्ये चड्डी बनियान गँग आली होती. त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगली आहे, असा टोला शिंदे यांनी कॉँग्रेसला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com