Pimples On Forehead  SAAM TV
लाईफस्टाईल

Pimple Free Skin Tips: कपाळावर पिंपल्स वाढतायत? 'या' टिप्स फॉलो करा, चेहऱ्याचे सौंदर्य जपा..

Forehead Pimples Cure Tips in Marathi: नियमित केस धुणे गरजेचे आहे. नाहीतर केसांमध्ये डँड्रफची समस्या निर्माण होते. परिणामी कपाळावर पिंपल्सचे प्रमाण वाढते. हेच पिंपल्सचे वाढणारे प्रमाण कमी करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar

बदलत्या हवामानाचा आपल्या त्वचेवर चांगला-वाईट परिणाम होतो. कपाळावर पिंपल्सची समस्या उद्भवणे ही एक समस्या सामान्य आहे. पण अनेक वेळा कपाळावरील पिंपल्सच्या समस्येमुळे महिलावर्ग चिंतेत असतो. पिंपल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. चेहऱ्यावर काळे डाग पडतात. यामुळे चारचौघात जाताना लाज वाटते. अतिसंवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना पिंपल्सचा जास्त त्रास होतो. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. त्वचेचे सौंदर्य टिकवणे हे आपल्या हातात असते. त्यामुळे पौष्टिक खाद्य पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा आणि त्वचा निरोगी ठेवा.

चला तर मग जाणून घेऊयात कपाळावरील पिंपल्सची समस्या उद्भवण्याची कारणे आणि उपाय..

केसात डँड्रफ

कपाळावर पिंपल्सची समस्या होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे केसातील डँड्रफ होय. यामुळे केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. नियमित केस धुवणे गरजेचे आहे. केस विंचरताना डोक्यातील डँड्रफ चेहऱ्यावर आणि कपाळावर पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिंपल्स येतात.

कंडिशनरचा वापर

केस धुतल्यावर आपण केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यावर कंडिशनर लावतो. पण हेच कंडिशनर कपाळावर पडल्यास पिंपल्सचा धोका वाढतो.

त्वचेची छिद्रे बंद होणे

चेहऱ्यावर आपल्या कपाळाच्या भागी जास्त प्रमाणात तेल असते. या तैलग्रंथी त्वचेचे संरक्षण करतात. तसेच त्वचेला आर्द्रता देतात. पण याचे जास्त प्रमाणा झाल्यास त्वचेवरील छिद्रे बंद होतात. ज्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवते.

मेकअप

आजकाल महिला सुंदर दिसण्यासाठी नियमित मेकअप करतात. त्यामुळे कपाळावर, चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवते. तसेच जास्त वेळ मेकअप चेहऱ्यावर राहिल्यास त्वचेचा पोत खराब होऊन त्वचेवरील पिंपल्सचे प्रमाण वाढते. चुकीच्या मेकअप प्रोडक्टमुळे सुद्धा चेहऱ्यावर पिपंल्स येतात. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतेही प्रोडक्ट लावायच्या अगोदर त्यांची पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे.

केमिकलचा वापर

कपाळावरील पिंपल्स कमी करण्यासाठी आपण अनेक क्रीम आणि औषधांचा वापर करतो. यांमधील केमिकल्समुळे देखील पिपंल्स होऊ शकतात.

हार्मोनल इम्बॅलन्स

किशोर वयामध्ये आणि मासिक पाळी दरम्यान आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोन इम्बॅलन्स होतात. त्यामुळे कपाळावर पिंपल्सचे प्रमाण वाढते.

कपाळावर पिंपल्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

  • नियमित अडीच ते तीन लीटर पाणी प्यावे आणि पौष्टिक आहाराचे सेवन करावे.

  • नवीन ब्युटी प्रोडक्ट्स चेहऱ्यावर लावण्याआधी त्याची पॅच टेस्ट करावी.

  • बाहेरून आल्यावर वेळेवर मेअकप काढावा.

  • दिवसातून ३ वेळा चेहरा स्वच्छ धुवा.

  • केस धुण्यासाठी अँटी डँड्रफ शॅम्पूचा वापर करावा.

  • नियमित ७ते ८ तासांची झोप घ्यावी.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT