Maharashtra Politics: बीडमध्ये पुन्हा मुंडे विरूद्ध मुंडे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा?

Beed Politics Heats Up Again: बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पेटणार आहे... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी बीडमध्ये नेमकं राजकारण का तापलयं? बीडमध्ये मुंडे भावा- बहिणींची निवडणुकीसाठी काय रणनीती आहे?
BJP leader Pankaja Munde and NCP leader Dhananjay Munde — the sibling rivalry that continues to shape Beed’s political landscape.
BJP leader Pankaja Munde and NCP leader Dhananjay Munde — the sibling rivalry that continues to shape Beed’s political landscape.Saam Tv
Published On

बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे... याला कारण ठरलयं, अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत दिलेला स्वबळाच्या नारा... त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारण पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा महासंग्राम होण्याची चिन्ह आहेत....मात्र बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशा संघर्षाला सुरुवात कधी झाली

2012 साली धनंजय मुंडेंच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे अशा संघर्षाला सुरुवात झाली...त्यानंतर झालेल्या 2014च्या परळी विधानसभेच्या निवडणुकीत मुंडे भावंड आमने-सामने आले. यात पंकजांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला. त्यानंतर वैद्यनाथ बॅंक आणि साखर कारखान्याच्या निवडणुकीतही मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहायला मिळाला...2016 ला परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे 33 पैकी तब्बल 27 जागा जिंकले. त्यानंतर 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीनं सर्वाधिक जागा मिळवल्या आणि पंकजा मुंडेंना शह दिला. हेच वर्चस्व धनंजय मुंडेंनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवत पंकजा मुंडेंचा पराभव केला.

बीडमध्ये अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होतोय...मात्र अजित पवारांनी बंडखोरी करून महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंडे भावा-बहिणींमधील दुरावा कमी झाला. मात्र महायुतीतील मित्रपक्षांनी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर स्वबळाचा नारा दिल्यानं राष्ट्रवादी आणि भाजपही बीडमध्ये आमनेसामने उभे राहण्याची शक्यता निर्माण झालीय...त्यामुळे पुन्हा एकदा बीडमध्ये मुंडे विरूद्ध मुंडे सामना रंगण्याची शक्यता आहे,.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com