Hot Air Balloon Ride  Saam Tv
लाईफस्टाईल

पर्यटकप्रेमींना Hot Air Balloon Ride ची भूरळ, तुम्हालाही आनंद लुटायचा असेल तरी ही आहेत सर्वोत्तम ठिकाणं

Travel Package : भारतात हॉट एअर बलून राइडचा आनंद घेण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. भारतातील हॉट एअर बलून राइड्स जयपूर, आग्रा, मनाली आणि दिल्लीसारख्या अनेक शहरांमध्ये आयोजित केल्या जातात.

Shraddha Thik

Hot Air Balloon Ride Package :

भारतात हॉट एअर बलून राइडचा आनंद घेण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. ही ठिकाणे सुंदर दृश्ये अनुभवण्यासाठी ओळखली जातात. भारतातील हॉट एअर बलून राइड्स जयपूर, आग्रा, मनाली आणि दिल्लीसारख्या अनेक शहरांमध्ये आयोजित केल्या जातात. ठिकाणांनुसार खर्च (Expenses) देखील कमी जास्त होतो. तसेच या राइडची किंमत ऋतूनुसार बदलू शकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही राइड्स मोठे असतात, तर काही शार्ट टर्म असतात. हॉट एअर बलून राईड दरम्यान पुरवल्या जाणार्‍या सेवांमध्ये इन्फलाइबल बलून, पायलटसह मार्गदर्शक यांचा समावेश होतो. हॉट एअर बलून राइड्ससाठी प्रसिद्ध असलेल्या काही भारतीय (Indian) शहरांची आणि ठिकाणांची यादी पाहूयात.

जयपूर, राजस्थान

राजस्थानची राजधानी जयपूर हे एक अतिशय सुंदर शहर आहे. जे एअर बलून राइडसाठीही प्रसिद्ध आहे. हॉट एअर बलून राईड्स दरम्यान, तुम्हाला जयपूरची अनेक दृश्ये पाहण्याची संधी मिळते. राईड्सद्वारे आकाशातून अंबर किल्ला, नाहरगड आणि अरवली टेकड्यांचे सुंदर दृश्य पाहता येते.

आग्रा, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्हा ताजमहालसाठी प्रसिद्ध आहे, जो जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. पण तुम्ही आग्रामध्ये हॉट एअर बलून राईडचाही आनंद घेऊ शकता. तुम्ही ताजमहालच्या खाली बलून राईडचा आनंद घेऊ शकता आणि यमुना नदी आणि आग्रा येथील प्रमुख आकर्षणे पाहू शकता.

मनाली, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक मनाली आहे, जे कुल्लू खोऱ्यात आहे आणि पर्यटक पर्वतांच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हॉट एअर बलून राइड्सचा आनंद घेण्यासाठी येथे येतात.

गोवा

तुम्ही गोव्याला फक्त रात्रीचे जीवन आणि समुद्रकिनाऱ्यांवर मजा करण्यासाठीच नाही तर हॉट एअर बलून राईडचा आनंद घेण्यासाठी देखील जाऊ शकता. बलून राईड दरम्यान आकाशातून गोव्याच्या सुंदर दृश्यांचा आनंद लुटता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज! बेसिक सॅलरी १५००० रुपयांवरुन ₹२५००० होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Lucky zodiac signs: कार्तिक कृष्ण षष्ठीत चार राशींना लाभ; आत्मविश्वास आणि आर्थिक सुधारणा दिसणार

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

SCROLL FOR NEXT