Dry Fenugreek Leaves Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Dry Fenugreek Leaves Benefits : हार्मोनल बदलांसाठी नाहीतर, महिलांच्या 'या' 5 समस्यासाठी फायदेशीर कसुरी मेथी

कसुरी मेथीमुळे जेवणाला चव तर येतेच पण आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dry Fenugreek Leaves Benefits : भारतीय मसाले हे आपल्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मात्र त्याचा वापर केवळ पदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी सीमित नसतो. मसाल्याच्या पदार्थांमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. परंतू केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठीदेखील कसुरी मेथी फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये त्याचे खास औषधी गुणधर्म नमूद करण्यात आले आहेत.

जेवणाची चव किंवा सुगंध वाढवण्यासाठी, कसुरी मेथीचा वापर प्रत्येक स्वयंपाकघरात केला जातो. कसुरी मेथीमुळे जेवणाला चव तर येतेच पण आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते. कसुरी मेथी हे आयुर्वेदात औषध मानले जाते. अनेक प्रकारचे रोग (Disease) बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो. चला जाणून घेऊया कसुरी मेथीच्या सेवनाने महिलांच्या (Women) कोणत्या 5 समस्या दूर होतात.

१. गर्भधारणेनंतरही फायदेशीर -

अशा महिला ज्यांना स्तनपान करवते त्यांनी कसुरी मेथीचे सेवन करावे.कसुरी मेथीमध्ये आढळणारे घटक आईचे दूध वाढवण्यास मदत करतात.

२. अॅनिमियाला प्रतिबंध करा -

भारतातील बहुतेक स्त्रिया अॅनिमियाच्या बळी आहेत. अशा महिलांसाठी कसुरी मेथीचे सेवन खूप फायदेशीर आहे. कसुरी मेथीमध्ये भरपूर लोह असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आपल्या आहारात कसुरी मेथीचा नक्कीच समावेश करा.

३. संसर्ग टाळा -

पोटाच्या संसर्गापासून बचाव करण्यासोबतच कसुरी मेथीचे सेवन हृदय, गॅस्ट्रिक आणि आतड्यांसंबंधी समस्या दूर ठेवण्यास मदत करते. महिलांना पोटाशी संबंधित काही समस्या असल्यास कसुरी मेथीची पाने वाळवून त्याची पावडर बनवा. या पावडरमध्ये लिंबाचे काही थेंब टाका आणि उकळलेल्या पाण्यासोबत घ्या.

४. योग्य हार्मोनल बदल करा -

महिलांच्या शरीरात आयुष्यभर हार्मोनल बदल होत राहतात.त्यामागे मासिक पाळी, गर्भधारणा, रजोनिवृत्ती इत्यादी कारणे आहेत.अशा परिस्थितीत कसुरी मेथीचे सेवन हार्मोनल बदलांवर नियंत्रण ठेवून त्यामुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यास मदत करते.

५. मधुमेहावर नियंत्रण ठेवा -

आहारातील व्यत्ययाचा थेट परिणाम तुमच्या रक्तातील साखरेवर होऊ लागतो.त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेथीचा वापर करा.मेथीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतात.त्यामुळे टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यताही कमी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT