Cardamom Benefits : रात्री झोपण्यापूर्वी खा मसाल्यातील 'हा' पदार्थ, सकाळी मिळतील अनेक फायदे

भारतीय स्वयंपाकघरात वेलचीचा वापर तिखटाच्या आणि गोडाच्या पदार्थांत देखील प्रामुख्याने होतो.
Cardamom Benefits
Cardamom Benefits Saam Tv

Cardamom Benefits : भारतीय स्वयंपाकघरात वेलचीचा वापर तिखटाच्या आणि गोडाच्या पदार्थांत देखील प्रामुख्याने होतो. पदार्थ स्वादिष्ट बनवण्याबरोबरीबनेच वेलचीत अनेक औषधी गुणधर्मदेखील दडले आहेत. मुखशुद्धीसाठी विड्यातून तसेच विविध पदार्थांतून वापरात असलेली वेलची शरीराचे स्वाथ्य वाढवण्यासाठी गुणकारी ठरते.

वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती (Plant) आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं

Cardamom Benefits
Water Chestnut Benefits : हिवाळ्यात उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवायचे आहे ? फायदेशीर ठरेल सिंघाडा !

वेलची एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची (Food) चव वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. यामध्ये लोह आणि रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन सी आणि नियासिन देखील असते. हे रेड ब्लड सेल्स निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण पाहुया वेलची खाल्ल्याने होणा-या काही फायद्यांविषयी

१. पचनक्रिया सुरळीत करते -

- जेवणानंतर अनेक लोक विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात करतात. कारण, विलायची नैसर्गिकरित्या गॅसला नष्ट करण्याचे काम करते.

- वेलची पचनशक्ती वाढवण्यात, पोटाची सूज कमी करण्यात आणि छातीतील जळजळ संपवण्याचे काम करते.

- आयुर्वेदिक ग्रंथांप्रमाणे विलायची पचनक्रियेत मदत करते. जर तुम्हाला अपचनाची समस्या आहे तर रात्री दोन विलायची, अद्रकचा छोटा तुकडा, थोडीशी लवंग आणि धने बारीक करा. हे पावडर गरम पाण्यासोबत घ्या. पोटासंबंधीत सर्व समस्या दूर होतील.

२. श्वासाची दुर्गंधी दूर होते -

- वेलचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात.

- यासोबतच वेलचीची तिखट चव आणि सुगंध श्वासांची दुर्गंधी दूर करते. ही डायजेस्टिव्हला मजबूत करते.

- रोज जेवण केल्यानंतर एक वेलची खा किंवा रोज सकाळी वेलचीची चहा प्या.

३. ॲसिडिटीपासुन आराम -

- वेलचीमध्ये उपलब्ध असलेले तेल ॲसिडिटीला नष्ट करते. वेलची चावल्यानंतर त्यामधून अनेक प्रकारचे

- तेल बाहेर पडतात. जे तुमच्या लाळ ग्रंथींना उत्तेजित करतात. यामुळे तुमचे पोट चांगल्या प्रकारे कार्य करते. वेलची खाल्लावर त्यामधील तेल गारवा देते. यामुळेच वेलची चावल्यावर होणारी ॲसिडिटीची जळजळ दूर होते.

४. फुफूसांसंबंधीत आजारांचा नैसर्गिक इलाज -

- वेलची दमा, खोकला, सर्दी आणि फुफूसांसंबंधीत आजारांपासुन आराम देते. आयुर्वेदात इलायचीला एक गरम मसाला मानले जाते. ही शरीराला आतुन गरम ठेवते. वेलचीचे सेवन केल्याने कफ बाहेर पडतो. सर्दी, खोकला किंवा छातीत कफ असेल तर वेलचीचे सेवन केल्याने या समस्या दूर होतात. जर तुम्हाला सर्दी झाली तर वाफ घेताना गरम पाण्याच्या भांड्यात थोडेसे वेलची तेल टाका.

Cardamom Benefits
Health Tips : अनेक आजारांवर फायदेशीर ठरेल लसूण, पुरुषांसाठी तर बहुगुणी !

५. एनीमियापासून वाचवते -

- एक ग्लास गरम दूधामध्ये एक-दोन चिमुट वेलची पावडर टाका. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर देखील टाकू शकता. एनीमियाचे लक्षण आणि अशक्तपणापासुन आराम मिळवण्यासाठी हे रात्री प्या.

६. कँसरपासून बचावते -

- वेलची मॅगनीजचे एक प्रमुख स्त्रोत आहे. मॅगनीज एंजाइमच्या स्रावमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. हे फ्री रॅडिकल्सला नष्ट करते. याव्यतिरिक्त वेलचीमध्ये शरीरातुन विषारीतत्त्व बाहेर काढण्याचे गुण असतात.

- ही कँसरपासुन वाचवण्याचे देखील काम करते.

७. हृदयाची गती नियमित करते -

- वेलची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. वेलची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच वेलची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. यामुळे जर तुम्ही आपल्या हार्टला नेहमी हेल्दी ठेवू इच्छिता तर नियमित विलायचीचे सेवन करा किंवा वेलचीची चहा पिण्यास सुरुवात करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com