Remove Ink From Clothes Saam TV
लाईफस्टाईल

Remove Ink From Clothes : कपड्यांवर लागलेला शाईचा डाग मिनिटांत होईल गायब; वाचा क्लीनिंग टिप्स

Ruchika Jadhav

जग कितीही पुढे गेलं आणि डिजीटलचं युग असलं तरी देखील विविध कामांमध्ये पेन लागतोच. लहान मुलं, विद्यार्थी आणि अगदी ऑफिसमध्ये काम करणारी मोठी माणसे सर्वांकडे पेन असतो. पेन वापरत असताना अनेकांना आपल्या खिशात पेन ठेवण्याची सवय असते. काहीवेळा पेन अचानक फुटतात. तेव्हा त्यातील शाई आपल्या कपड्यांना लागते.

शाई लागलेला शर्ट पुन्हा वापरता येत नाही, कारण शाईचा डाग त्यावर फार विचित्र दिसतो. आता कपड्यांवर धुळ, माती, चिख्खल असे डाग असल्यास ते घालवण्यासाठी घरातील महिला विविध ट्रिक्स वापरतात. डाग घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्फ, निर्मा आणि साबण वापरला जातो. मात्र जर कपड्यांना शाईचा डाग लागला आणि शर्ट नवीन असेल तर तो डाग काढता काढता महिलांच्या नाकी नऊ येतात.

त्यामुळेच शर्टावरील किंवा अन्य कोणत्याही कापडावरील शाईचा डाग कसा काढायचा याच्या आम्ही काही टिप्स आणि ट्रिक्स शोधल्या आहेत. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

टूथपेस्ट

कपड्यांवर लागलेला शाईचा किंवा इंकचा डाग काढण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. त्यासाठी टूथपेस्ट ज्या शर्टावर इंक लागली आहे तेथे अप्लाय करा. टूथपेस्ट तिथे किमान १० ते २० मिनिटे तशीच राहूद्या. टूथपेस्ट सुकल्यानंतर त्यावर सर्फ टाकून शर्ट धुवून घ्या. तुम्हाला ही स्टेप २ ते ३ वेळा तरी करावी लागेल. असे केल्याने हळूहळू डाग गायब होतील.

दूध

शाई लागलेला शर्ट किंवा तेवढा भाग दुधात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे दूध फेकून द्या आणि शर्टावर पाणी तसेच निर्मा पावडर टाकून धुवून घ्या. याने देखील शाईचा डाग जाण्यास मदत होते.

शेवींग क्रिम

पती वापरत असलेली शेवींग क्रिम त्यांच्याच शर्टावरील शाईचा डाग काढण्यासाठी रामबाण उपाय ठरेल. जेथे इंक लागली आहे तेथे शेवींग क्रिम लावून ठेवा. २० मिनिटांनी शर्ट घासून स्वच्छ धुवून घ्या. ही ट्रिक नक्की काम करेल.

लिंबू आणि मीठ

लिंबू आणि मीठ आनेक प्रकराच्या डागांवर काम करते. त्यामुळे कपड्यांवर जिथे शाई लागली आहे, तिथे आधी लिंबाचा रस पिळून घ्या. त्यानंतर त्यावर मीठ टाकून घ्या. मीठ आणि लिंबाचा रस यामुळे कापड स्वच्छ होण्यास मदत होते. लिंबामध्ये असलेले रासायनिक घटक कापडावरील डाग दूर करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

SCROLL FOR NEXT