Interdependent Relationship Tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Relationship Tips: इंटरडिपेंडेंट रिलेशनशिपला अधिक मजूबत करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

इंटरडिपेंडेंट रिलेशनशिपसाठी या टिप्स फॉलो करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लग्नाच्या सुरुवातीच्या क्षणांचा आपण खूप चांगल्या प्रकारे आनंद घेतो परंतु, त्यानंतर नात्यात अनेक गोड गैरसमज निर्माण होऊ लागतात. एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा यांचे कारण असू शकते. (Relationship Tips in Marathi)

हे देखील पहा -

लग्न (Wedding) होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर आपण आपल्या जोडीदाराला अनेक गोष्टी सांगत असतो त्यामुळे आपले नाते (Relation) अधिक सुदृढ बनत असते. काही नात्यांमध्ये एकमेकांच्या आवडीनिवडीवरुन खटके उडू लागतात तर काही एकमेकांचे आयुष्य सतत कंट्रोल करायचे असते. त्यामुळे नात्यात ठिंणगी पडून ते तुटायला येऊ लागते. अशावेळी इंटरडिपेंडेंट रिलेशनशिप अधिक महत्त्वाचे ठरु शकते. यावेळी जोडीदारासोबत भावनिकरित्या जोडण्यापेक्षा जीवनसाथी म्हणून पाहाणे अधिक महत्त्वाचे ठरेल. इंटरडिपेंडेंट रिलेशनशिपसाठी कोणत्या टिप्स आपण फॉलो करायला हव्या ते पाहूया.(Interdependent Relationship Tips)

१. लग्नाआधी आपली स्वत:ची ओळख असते व लग्नाच्या काही क्षणानंतर ती ओळख नाहीशी होते अशावेळी स्वत:ची ओळख जपण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच आपल्या जोडीदाराची देखील ओळख जपा.

२. कोणत्याही नात्यात संवाद अधिक महत्त्वाचा आहे. आपल्या जोडीदारासोबत नेहमी प्रामाणिक रहा. एकमेकांचे म्हणणे ऐकून घ्या.

३. नात्यात प्रेम, आपलेपणा टिकवून ठेवण्यासाठी शक्यत तितके प्रयत्न करा. स्वत:चा गरजा स्वत: पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नात्यांमध्ये तडजोड व त्याग हा करावा लागतो.

४. आपण कामात कितीही व्यस्त असलो तरी एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. त्यासोबत स्वत:ला वेळ देणेही गरजेचे आहे.

५. आपल्या ध्येयाला साध्य करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा लग्न झाल्यानंतर आपण आपल्या करिअरला पूर्णविराम देतो असे करु नका त्यामुळे देखील आपल्या नात्यात अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

SCROLL FOR NEXT