CNG Car Mileage Tips Saam Tv
लाईफस्टाईल

CNG Car Mileage Tips : तुमच्या CNG कारचे मायलेज वाढवायचंय? या टिप्स फॉलो करा

How To Increase CNG Car Mileage : लोक CNG चा पर्याय वापरतात जेणेकरून त्यांचा दैनंदिन खर्च कमी होईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

CNG Car Mileage : लोक CNG चा पर्याय वापरतात जेणेकरून त्यांचा दैनंदिन खर्च कमी होईल. यासाठी ते बूट स्पेसबाबत तडजोड करण्यासही तयार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सीएनजी कारचे मालक असाल, तर येथे तुम्हाला सीएनजी वाहनांचे मायलेज वाढवण्याबद्दल सांगणार आहोत.

ओव्हर स्पीडिंग टाळा

तुम्‍हाला तुमच्‍या सीएनजी (CNG) कारकडून खरोखरच सर्वोत्तम रेंजची अपेक्षा असल्‍यास, तुम्‍हाला सर्वप्रथम तुमचा वेग नियंत्रित करायचा आहे. बरेच लोक रॅश ड्रायव्हिंगमध्ये गुंततात, परिणामी तुम्हाला कमी मायलेज मिळतो. त्यामुळे मर्यादेत गाडी चालवण्याचा सल्ला दिला जातो आणि अधिक चांगल्या मायलेजचा आनंद घ्या.

वेळेवर वाहन सर्विसिंग

सीएनजी कार असो किंवा पेट्रोल-डिझेलवर चालणारे वाहन (Vehicle) असो, वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. बरेच लोक पैसे वाचवण्यासाठी स्थानिक मेकॅनिककडून त्यांची कार सर्व्हिस करून घेतात, तरीही कारच्या इंजिनमध्ये फरक पडतो. ज्यामुळे पुढे मायलेज कमी होते.

टायरमधील हवेचा दाब

वाहनाच्या टायरचा दाब थेट वाहनाच्या मायलेजशी संबंधित असतो. जर तुमच्या वाहनाचा दाब कमी असेल तर त्याचा इंजिनवर दबाव निर्माण होईल तसेच तुमचे CNG वाहन देखील कमी मायलेज देईल. म्हणून, जेव्हाही तुम्ही CNG भरायला जाल तेव्हा इंधन पंपावर टायरचा दाब तपासून घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगला मायलेज मिळेल.

एयर फिल्टर साफ करा

सीएनजी कारमध्ये एअर फिल्टर सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुमच्या कारचे (Car) एअर फिल्टर गलिच्छ असेल तर सीएनजी इंजिनवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे कारचे मायलेज कमी होऊ शकते. म्हणूनच कारचे एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

SCROLL FOR NEXT