Tata Altroz CNG: 5-स्टार सेफ्टी रेटिंग, इलेक्ट्रिक सनरूफ; जबरदस्त मायलेजसह Tata Altroz ​​CNG भारतात लॉन्च

कमी किंमत आणि जबरदस्त मायलेज, नवीन Tata Altroz ​​CNG भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत फीचर्स
Tata Altroz CNG version launched
Tata Altroz CNG version launchedSaam Tv

Tata Altroz CNG version launched: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटमध्ये आपली भक्कम जागा निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. कंपनीने यातच आली नवीन Altroz ​​CNG भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. टाटा अल्ट्रोझ सीएनजी सहा प्रकार आणि 4 रंग पर्यायांमध्ये बाजारात सादर करण्यात आली आहे.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी 7.55 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. जी टॉप मॉडेलसाठी 10.54 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे. ही सीएनजी कार 3 वर्षे आणि 1 लाख किमीच्या वॉरंटीसह येते.

Tata Altroz CNG version launched
Instagram Hacking Scam : तुमची एक चूक अन् इंस्टाग्राम हॅक ! कसे प्रोटेक्ट कराल तुमच्या अकाउंटला, जाणून घ्या प्रोसेस स्टेप-बाय-स्टेप

Tata Altroz CNG Engine: इंजिन

अल्ट्रोझ सीएनमध्ये 1.2-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे CNG तंत्रज्ञानासह येते. हे इंजिन 6000 rpm वर 73.5 bhp पॉवर आणि 3500 rpm वर 103 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.  (Latest Marathi News)

यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. यात दोन्ही सिलिंडर मागील बाजूस खाली ठेवण्यात आले आहेत, जे हार्ड प्लास्टिकच्या कव्हरने झाकण्यात आले आहेत. Tata Altroz ​​CNG 200 लीटर बूट स्पेस मिळतो.

Tata Altroz CNG version launched
Earbuds Cleaning Hacks : सावधान ! इअरबर्ड्समुळे कानांना होऊ शकते इन्फेक्शन, कसे कराल साफ ? जाणून घ्या

Tata Altroz ​​ICNG अॅडव्हान्स सिंगल ECU सह येते. ज्यामुळे इंधनाची बचत होण्यास मदत होते. याचा सिंगल ईसीयूमुळे, पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये स्विच करण्यात कोणतीही अडचण येत नाही. Altroz ​​ICNG ला एक मायक्रो स्विच देखील मिळतो. जो कारला इंधन भरण्याच्या वेळी चालू ठेवण्यास मदत करतो. (Latest Auto News in Marathi)

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर Altroz ​​CNG मध्ये व्हॉईस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर आणि एअर प्युरिफायर सारखे नावीन फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यात 8 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले देण्यात आला आहे.

यात प्रोजेक्टर हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, R16 डायमंड कट अलॉय व्हील, प्रीमियम लेदर सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट देण्यात आली आहे. ही कार हे 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com