Hanuman 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Mangalwar Che Upay: मंगळवारच्या दिवशी हनुमानचा आशीर्वादाचा मिळवण्यासाठी करा हे उपाय; प्रत्येक कामात मिळेल यश

Mangalwar Totke: मंगळवार हा दिवस पवनपुत्र हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने, त्यांची कृपादृष्टी प्राप्त होते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळते अशी श्रद्धा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मानुसार, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेला आहे. यामध्ये मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पुजा केली जाते. असं मानलं जातं की, हनुमानजींचा जन्म मंगळवारी झाला होता, म्हणून मंगळवार हा खूप शुभ दिवस मानला जातो.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत मंगळ अशुभ आहे त्यांनी मंगळवारी विशेष उपाय केले पाहिजेत. असं केल्याने त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अशुभ घटना टळू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे.

हनुमानाची पुजा करा

दर मंगळवारी योग्य पद्धतीने हनुमानजींची पूजा केली पाहिजे. यावेळी सिंदूर आणि चमेलीच्या तेलाने चोळा अर्पण करा. इतकंच नाही शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे. यावेळी शक्य असल्यास हनुमान चालीसा देखील पठण केलं पाहिजे. या छोट्या उपायांनी हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे.

हनुमानासाठी या मंत्राचा जप करा

दर मंगळवारी हनुमानजींच्या मंत्रांचा जप केल्याने तुमचा दिवस चांगला जाणार आहे. याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. ज्यामुळे तुम्ही सर्वात कठीण कामं देखील सहजपणे करू शकाल.

  • ऊं हं हनुमते नमः

  • ऊं नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा

  • ऊं नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय

  • ऊं ऐं ह्रीं हनुमते श्री रामदूताय नमः।

मंगळवारच्या दिवशी या गोष्टींचं दान करा

जर एखाद्याच्या कुंडलीत मंगळ अशुभ स्थितीत असेल तर त्याने मंगळवारी गरजू लोकांना काही गोष्टी दान केल्या पाहिजेत. यामध्ये तुम्ही लाल कपडे, लाल फळे, लाल मिठाई, मसूर, तांब्याची भांडी आणि गूळ या गोष्टी दान करू शकता.

या गोष्टी हनुमानाला अर्पण करा

मंगळवारी हनुमानजींना शुद्ध देशी तुपापासून बनवलेला चुरमा अशा खास वस्तू अर्पण कराव्यात. याशिवाय बुंदीचे लाडूही हनुमानजींना खूप प्रिय आहेत. यावेळी केळीचा नैवेद्य तुम्ही हनुमानजींना दाखवू शकता. असं केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : क्रिकेटच्या इतिहासात जे घडलं नव्हतं ते मँचेस्टर कसोटीत घडलं; गंभीर-गिलच्या निर्णयानं सगळेच हैराण, नेमकं झालं तरी काय?

Pune : चारित्र्याच्या संशयावरुन गरोदर पत्नीच्या पोटात ठोसा मारला, पतीने केलेल्या मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरात जोरदार पाऊस

Maharashtra Politics: शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नजर; अंतिम मंजुरीसाठी फडणवीसांचीच लागेल सही

South India Rice Dishes: साधा भात खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा 'हे' साऊथ इंडियन टेस्टी राईस डिशेस

SCROLL FOR NEXT