आजकाल जवळपास प्रत्येक काम मोबाईल फोनद्वारे सहजपणे केले जाते. मग ते कॉल किंवा मेसेजिंग असो, बँकिंग व्यवहार असोत, सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणे, गेम खेळणे, किंवा मनोरंजन घेणे – सर्व काही मोबाईलवर शक्य आहे. त्यामुळे लोक सतत नवीन फीचर्ससाठी नवीन मोबाईल खरेदी करतात आणि जुना मोबाईल विकून टाकतात. मात्र तो विकताना काही महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असते.
दरवर्षी मोबाईल कंपन्या नव्या फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करतात, त्यामुळे अनेकजण आपला जुना मोबाईल एक्सचेंज करतात किंवा विकतात. काही लोक तो दुकानात विकतात तर काहीजण थेट दुसऱ्याला मोबाईल देतात. पण जुना मोबाईल विकण्यापूर्वी काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं, अन्यथा भविष्यात त्रास होऊ शकतो. जाणून घ्या त्या ४ महत्त्वाच्या गोष्टी.
पहिली गोष्टी
जुना मोबाईल विकण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या – तुमचा गुगल किंवा जीमेल आयडी मोबाईलमधून पूर्णपणे काढा. जर तो काढला नाही, तर तुमचा वैयक्तिक डेटा दुसऱ्याच्या हाती जाऊन गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे मोबाईल रीसेलपूर्वी आयडी सुरक्षितपणे हटवणे अत्यावश्यक आहे.
दुसरी गोष्ट
मोबाईल विकण्यापूर्वी गॅलरीतील सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यात वैयक्तिक माहिती असू शकते. फक्त डिलीटच नाही, तर संपूर्ण स्टोरेजही क्लिन करा, जेणेकरून कोणताही डेटा उरू नये आणि तो दुसऱ्याच्या हाती जाऊन गैरवापर होण्याचा धोका टळेल.
तिसरी गोष्ट
मोबाईलमधून सर्व डेटा डिलीट केल्यानंतर, शेवटचं महत्त्वाचं पाऊल म्हणजे ‘फॅक्टरी रीसेट’ करणे. ही प्रक्रिया केल्याने मोबाईलमधील उरलेला कोणताही डेटा पूर्णपणे नष्ट होतो. त्यामुळे, मोबाईल विकण्यापूर्वी तो रीसेट केल्यास तुमची वैयक्तिक माहिती दुसऱ्याच्या हाती जाण्याचा धोका टळतो.
चौथी गोष्ट
मोबाईल विकल्यानंतर भविष्यात अडचण टाळण्यासाठी विक्रीचा काही पुरावा ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही मोबाईल दुकानात, मित्राला किंवा अनोळखी व्यक्तीला दिला असेल, तरी एक लिहिलेला किंवा डिजिटल पुरावा ठेवा. त्यामुळे मोबाईलचा गैरवापर झाल्यास तुम्ही जबाबदार धरले जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.