Male Fertility saam tv
लाईफस्टाईल

Male Fertility: बाबा व्हायचंय? मग पुरुषांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Male Reproductive Health: फॉलिक ॲसिड केवळ महिलांसाठीच नाही, तर पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे. शुक्राणूंची निर्मिती, डीएनएची गुणवत्ता आणि फोलेटची भूमिका जाणून घ्या. फोलेटयुक्त पदार्थ कोणते, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती वाचा.

Surabhi Jayashree Jagdish

गर्भधारणेचं नियोजन करताना महिलांच्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घेतली जाते. पण यामध्ये पुरुषांचं आरोग्यही तितकेच महत्त्वाचं असतं. पुरुषांच्या शरीरात निरोगी शुक्राणू तयार होण्यासाठी फोलेट हे जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे बाबा होण्याचं नियोजन करणाऱ्या पुरुषांनीही आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फॉलिक ॲसिड हे केवळ महिलांसाठीच आवश्यक नसून पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे. पण फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेतल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतेच, असं नाही. त्यामुळे या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

फोलेट म्हणजे काय?

फोलेट हे व्हिटॅमिन बी ९ चे नैसर्गिक स्वरूप आहे. हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्यं, वाटाणे, संत्री यांसारखी लिंबूवर्गीय फळे आणि जीवनसत्त्वे घातलेली धान्ये यांमधून शरीराला फोलेट मिळतं. फॉलिक ॲसिड हे याच जीवनसत्त्वाचं स्वरूप आहे.

ठाण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. विशेषा यादव म्हणाल्या की, शरीरातील नवीन पेशी तयार होण्यासाठी आणि डीएनए म्हणजेच शरीरातील आनुवंशिक माहिती तयार होण्यासाठी फोलेटची गरज असतं. निरोगी शुक्राणू तयार होण्यासाठी आणि त्यांच्यातील आनुवंशिक माहिती सुरक्षित राहण्यासाठीही हे जीवनसत्त्व महत्त्वाचे आहे.

शुक्राणूंच्या निर्मितीत फोलेटची भूमिका काय?

पुरुषांच्या शरीरात शुक्राणू तयार होण्यासाठी पेशींची योग्य वाढ होणं आणि डीएनए तयार होणं गरजेचं असतं. या दोन्ही प्रक्रियांमध्ये फोलेट महत्त्वाचे काम करतं. शरीरात फोलेटची कमतरता असल्यास शुक्राणूंच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होऊ शकतो. शुक्राणूंची संख्या किती आहे, ते किती वेगाने हालचाल करतात आणि त्यांचा आकार कसा आहे, याचा फोलेटच्या प्रमाणाशी काही संबंध आहे का, यावर संशोधन करण्यात आले आहे.

शुक्राणूंमधील डीएनए सुरक्षित ठेवण्यासाठीही गरजेचं

पुरुषांच्या प्रजननक्षमतेमध्ये शुक्राणूंमधील डीएनएची गुणवत्ता महत्त्वाची असते. शरीरावर वाढणारा ताण आणि काही पोषक घटकांची कमतरता यामुळे शुक्राणूंमधील आनुवंशिक माहितीचे नुकसान होऊ शकते. डीएनए तयार होण्यासाठी फोलेटची गरज असल्याने शुक्राणूंच्या आरोग्याच्या दृष्टीनेही या जीवनसत्त्वाचा अभ्यास केला जातोय.

पुरुषांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

ज्या पुरुषांना बाबा होण्याचं नियोजन करायचंय त्यांनी रोजच्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, वाटाणे, संत्री यांसारखी फळे आणि फोलेट असलेली धान्ये खावीत. याशिवाय शरीराला झिंक, व्हिटॅमिन बी १२ आणि इतर आवश्यक पोषक घटकही योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे केवळ एका जीवनसत्त्वावर अवलंबून न राहता संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे.

फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेताना काळजी घ्या!

शरीरात फोलेटची कमतरता असल्यास, आहारातून पुरेसं पोषण मिळत नसल्यास किंवा काही विशिष्ट आरोग्याच्या समस्या असल्यास डॉक्टर फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देऊ शकतात. पण बाबा होण्याचं नियोजन करणाऱ्या प्रत्येक पुरुषाने या गोळ्या घेतल्याच पाहिजेत, असं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात फॉलिक ॲसिड घेणं टाळावं. कारण फॉलिक ॲसिडचं प्रमाण जास्त झाल्यास शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असूनही तिची लक्षणं दिसून येत नाहीत.

पुरुषांनीही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं

फोलेट हे शरीरात डीएनए तयार करण्यासाठी आणि नवीन पेशींच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं जीवनसत्त्व आहे. शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेतही त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे गर्भधारणेचे नियोजन करताना पुरुषांनीही संतुलित आहार घेऊन शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतील याची काळजी घ्यावी.

फोलेट हे केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही आवश्यक आहे. गर्भधारणेचं नियोजन करताना दोन्ही जोडीदारांनी आपल्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य पोषण, निरोगी जीवनशैली आणि तज्ज्ञांचा सल्ला यामुळे प्रजनन आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर'चं नाव बदलणार? शिंदेंच्या नेत्याचं मोठं विधान

EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! रिटायर्डमेंटनंतर PF मधील रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येणार, काय आहे SWP योजना?

Knee strengthening exercises: गुडघ्यांमधून कटकट आवाज येतोय? गुडघ्यांच्या मजबूतीसाठी घरच्या घरी करा हे 5 सोपे व्यायाम

डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करायची आहे? करून बघा हे 5 नैसर्गिक उपाय

New Marathi Serial : 'याड' नाही तर 'ओढ' लावणारी लव्हस्टोरी! नव्या मराठी मालिकेची घोषणा, मुख्य भूमिकेत कोण अन् रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT