डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करायची आहे? करून बघा हे 5 नैसर्गिक उपाय

Manasvi Choudhary

डोळ्यांच्या समस्या

डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि सूज येणे ही आजकाल सामान्य समस्या बनली आहे. ताणतणाव, जास्त वेळ स्क्रीन पाहणे, हायड्रेशन आणि अपुरी झोप यामुळे ही समस्या उद्भवते.

Eye Care Tips | canva

घरगुती उपाय

यावर उपाय म्हणून तुम्ही जीवनशैलीत बदल आणि नैसर्गिक उपाय करू शकता.

Eye Care Tips | Saam Tv

काकडीच्या थंड चकत्या

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी काकडीच्या थंड चकत्या डोळ्यांवर ठेवा. हा घरगुती उपाय डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. काकडीच्या थंड प्रभावामुळे डोळ्यांजवळची त्वचा शांत होते जळजळ कमी होते.

Chilled Cucumber Slices | PINTREST

दिवसभर पुरेसे पाणी प्या

दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि रक्ताभिसरणाची पातळी सुधारण्यास मदत होते.

drink water | pinterest

अॅलर्जी

ॲलर्जीमुळे आणि डोळे चोळल्याने डोळ्यांची सूज अधिक वाढू शकते. तसेच तुम्ही जेव्हा घराबाहेर असताना तेव्हा सनग्लासेस वापरा आणि डोळे चोळणे टाळा यामुळे डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेला इजा होणार नाही.

eyes allergy | pintrest

पुरेशी झोप घ्या

डोळे थकण्याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी झोप. शरीराला आणि डोळ्यांना विश्रांती मिळण्यासाठी दररोज ७ ते ९ तास झोपणे आवश्यक असते, ज्यामुळे सकाळी डोळ्यांना सूज येत नाही.

sleep | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: 10 मिनिटांत सांगा! हत्तीच्या फोटोमध्ये एकूण किती प्राणी लपले आहेत?

Optical Illusion Challenge
येथे क्लिक करा...