Manasvi Choudhary
सोशल मीडियावर अनेक मजेशीर कोडी व्हायरल होतात. यापैकी काही स्पष्ट दिसतात तर काही अशी असतात जी ओळखणे कठीण असते.
हे फोटो पाहताना जेवढे साधे वाटतात, तितकेच ते हुशारीने बनवलेले असतात. या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हा अनेकांसाठी एक आवडीचा आणि मनोरंजक खेळ आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये तुम्हाला एकूण किती प्राणी लपले आहेत? हे ओळखायचे आहे.
या फोटोमध्ये तु्म्ही नीट पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की फक्त हत्तीच नाही तर हत्तीच्या शरीराभोवती अनेक प्राणी आहेत. या चित्रात माशासारखे, कासवासारखे आकारही दिसतील. तर चित्रात डास, गाढव, साप, मांजर, उंदीर, मगर, माजंर दिसत आहे.
हे कोडे सोडवण्यासाठी वाचकांकडे १० मिनिटांचा कालावधी असतो. पहिल्या नजरेत हे पोपट सहसा सापडत नाहीत, ज्यामुळे डोळ्यांची आणि बुद्धीची चांगलीच कसरत होते.
चित्रामध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना डोळे आणि मेंदू अधिक सक्रिय होतो. तसेच अशा प्रकारची कोडी सोडवल्यामुळे मेंदूची एकाग्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.