Manasvi Choudhary
महिला लग्नानंतर साडी परिधान करतात. सध्या तरूणींमध्ये साड्यांच्या अनेक डिझाईन्स प्रसिद्ध आहे.
ऑर्गेन्झा, चिकनकारी आणि टिश्यू साड्यांना महिला पंसती देत आहेत. तुम्हाला देखील या साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही लेटेस्ट डिझाईन्सच्या साड्या निवडा.
ऑर्गेन्झा साडी या वजनाला हलक्या असतात त्यामुळे या साड्यांना महिला निवडतात. छोट्या- मोठ्या फंक्शनसाठी किंवा सणासुदीसाठी तुम्ही ऑर्गेन्झा साड्यांची निवड करू शकता.
ऑर्गेन्झा साड्या सिंपल आणि डिझायनर अशा दोन प्रकारात असतात. सिंपल साड्यामध्ये प्रिंट्स असतात तर डिझायनर साड्यांच्या काठाला डिझाईन्स, मोती वर्क डिझाईन केलेली असते.
लखनवी चिकनकारी साड्यांची क्रेझ महिलांमध्ये कायमच असते. तुम्ही देखील या साड्या निवडणार असाल तर लेटेस्ट पॅटर्नच्या साड्या निवडा. पीच, पिस्ता आणि लव्हेडंर कलरच्या चिकनकारी साड्यांना विशेष पसंती देत आहेत.
टिश्यू साड्या या साडीच्या कापडामुळे लोकप्रिय आहेत. या साडीचे कापड हे अत्यंत मऊ असते त्यामुळे या साड्या नेसायला सोप्या आणि हलक्या असतात.
सध्या घुगरू टिश्यू साड्यांचा ट्रेंड आहे. साडीवर घुंगरू लावल्यामुळे साडी खुपच सुंदर दिसते. पिंक, ब्ल्यू, रेड या रंगामध्ये या साड्या आहेत.