Flax Seeds For Hormonal Imbalance : दैनंदिन जीवनशैलीमध्ये अनियमित खानपाणामुळे बऱ्याच लोकांमध्ये हार्मोन इनबॅलेन्सची लक्षणे दिसून येतात. खरतर, हार्मोन्स एंडोक्राईन ग्रंथीपासून बनणारे रसायन असते, जे रक्तामार्फत शरीरातील अन्य भागांमध्ये पोहोचून वेगवेगळे कार्य करते.
कमी जास्त होणाऱ्या हार्मोन्सचा प्रभाव आपल्या मेटाबोलिजमवर होतो. त्याचबरोबर मानवी शरीरामध्ये तब्बल 230 हार्मोन्स असतात. अशातच हार्मोन्स समस्या हे वाढते वय, ताणतणाव, अस्वस्थ जीवनशैली, स्टेरॉएड औषधांचे जास्त प्रमाणात सेवन किंवा वजन जास्त वाढल्यावर देखील होऊ शकते.
आज आम्ही तुम्हाला हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठी एक खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे हार्मोन्स नियंत्रित राहण्यास मदत होईल.
हार्मोन्समध्ये येणाऱ्या असंतुलनाचा प्रभाव आपल्या आरोग्यावर (Health) होतं. त्याचबरोबर आपल्या केसांपासून ते त्वचेपर्यंत याचा प्रभाव दिसून येतो. मूड बदलणे, तेलकट त्वचा आणि तेलकट केस, भूक न लागणे, झोप न येणे, चिंता, तणाव (Stress) आणि चिडचिडेपण या सगळ्या गोष्टी हार्मोन बदलताना संकेत देतात.
त्याचबरोबर गर्भावस्था, मासिक पाळी आणि मेनोपॉजमध्ये हार्मोन्सचे संतुलन बिघडून जाते. खास गोष्ट ही आहे की आज हार्मोन इनबॅलन्सची समस्या कुठल्याही वयोगटापर्यंत सीमित नाही आहे. ही समस्या व्यस्त दिनाचर्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) सर्व वयोगटातील महिलांना (Women) होते.
यावर अळशीच्या बिया आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. अळशीच्या बियांमुळे हार्मोन कंट्रोलमध्ये राहतात. अळशीच्या बियांमध्ये असणारे ओमेगा फॅटी ऍसिड हे हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मदत करते.
हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी त्या पद्धतीने का अळशीच्या बिया :
अळशीच्या बियांना मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. त्यानंतर तुम्ही विविध प्रकारच्या आहारामध्ये जवसाच्या बियांची पावडर खाऊ शकता. जवसाच्या बिया नुसत्या खाल्ल्या तरी सुद्धा चालतात. परंतु मिक्सरमध्ये बारीक वाटल्याने बिया पचायला सोप्या जातात. याशिवाय तुम्ही अळशीच्या बिया पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजवून पाण्याचे सेवन करू शकतात.
1. किती प्रमाणात अळशीच्या बिया खाव्या : एक ते दोन चमचे जवसाच्या बियांचे सेवन केल्याने तुमचे हार्मोन्स करीत राहण्यास मदत होते. परंतु तुम्हाला जवसाच्या बिया जास्त प्रमाणात खायच्या नाही आहे. कोणत्याही गोष्टीचे सेवन जास्त प्रमाणात केले की ते नुकसानदायक ठरते.
अळशीच्या बिया खाण्याचे फायदे :
1. भरपूर प्रमाणात फायबर असते :
अळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. हे फायबर आतड्यांसाठी चांगले असते. त्याचबरोबर तुमचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मदत होते.
2. एस्ट्रोजनच्या संतुलनामध्ये फायदेशीर ठरते :
अळशीच्या बियांमध्ये लीगनेन नावाचे फायटोएस्ट्रोजन असते. जे सरळ एस्ट्रोजेनच्या संश्लेषणाला जोडलेले असते. त्याचबरोबर हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी मदत करते.
3. ब्लड शुगर कंट्रोल :
ब्लड शुगरच रेग्युलेट न राहणं हे बऱ्याचदा हार्मोन्सच्या असंतुलित कारणामुळे होते. एका अध्ययनामध्ये असे सांगितले आहे की अळशीच्या बियांचे सेवन केल्याने हाय ब्लड शुगर आणि इन्सुलिन रजिस्टन्सला कमी करण्यासाठी मदत मिळते.
4. ओमेगा 3 फॅटी असिड :
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी असिड असते. जे हार्मोन्सला संतुलित ठेवण्यासाठी मदत करते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.