Happy Hormones : मूड आनंदी करण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

तुमच्या मूडवरून आरोग्यावर परिणाम होतो.
Happy Hormones
Happy HormonesSaam Tv

Happy Hormones : असं म्हणतात की, निरोगी राहण्यासाठी आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मूडवरून आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील जे नेहमी आनंदी असतात, तर काही लोक असे असतात जे दुःखी राहतात. मूड बदलण्याचे कारण हार्मोन्स देखील असू शकतात. शरीरात या हार्मोन्सची कमतरता असल्यास आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होतो.

शरीरात चार प्रकारचे आनंदी हार्मोन असतात -

डोपामाइन, एंडोर्फिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन. जर ते सक्रिय राहिले तर तुम्ही आनंदी होऊ शकता. हे हार्मोन्स वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात (Diet) या गोष्टींचा समावेश करू शकता.

Happy Hormones
Hormonals Issue : महिलांनो, लैगिंक संबंध ठेवताना पुरुषांमध्ये दिसते का? हार्मोन्सची कमतरता; 'ही' आहेत त्याची लक्षणे

एंडोर्फिन -

हा हार्मोन तुमचे मन शांत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो. जर तुम्हाला शरीरात हा हार्मोन वाढवायचा असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता. याशिवाय तुम्ही व्यायामही करू शकता. असे केल्याने तुमच्या शरीरातील हे हार्मोन्स वाढू शकतात.

डोपामाइन -

जेव्हा तुम्ही एखादे काम करता आणि ते पूर्ण केल्यावर तुम्हाला जो आनंद मिळतो, तो डोपामाइनमुळेच असतो. शरीरात हा हार्मोन वाढवण्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता. तुम्ही रोज १-२ लवंग चघळू शकता, सकाळच्या उन्हात बसण्याव्यतिरिक्त हे हार्मोन्स शरीरात वाढू शकतात.

Happy Hormones
Health food for mood swings : अचानक भूक लागते? मूड खराब झाला आहे? तर या पदार्थांचे सेवन करा मिनिटांत होईल बदल

ऑक्सिटोसिन -

हा हार्मोन एखाद्यावर प्रेम दाखवण्यासाठी जबाबदार असतो. जेव्हा तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत असता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कसे वागता किंवा तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त करता हे या हार्मोनवर अवलंबून असते. त्याला प्रेम संप्रेरक देखील म्हणतात. तुम्हाला आवडत असलेल्या लोकांकडून किंवा त्यांच्यासोबत राहून तुम्हाला आनंद मिळतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, फिरायला जा. असे केल्याने शरीरात हे हार्मोन्स वाढतात.

सेरोटोनिन -

हा हार्मोन पचनशक्तीवर परिणाम करतो, याशिवाय ताणही दूर करतो. ते शरीरात वाढवण्यासाठी तुम्ही काजू, तुपाचे सेवन करू शकता. शारीरिक हालचालींमुळेही हे हार्मोन्स शरीरात वाढतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com