'बिग बॉस मराठी 6' हा शो 11 जानेवारीपासून सुरू होत आहे.
नुकतीच 'बिग बॉस मराठी'च्या कलाकारांची ग्रँड रियुनियन पार्टी झाली.
'बिग बॉस मराठी'च्या रियुनियनला अनेक कलाकार पाहायला मिळाले.
सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी 6'ची चर्चा पाहायला मिळत आहे. 11 जानेवारीपासून हा धमाकेदार शो सुरू होत आहे. या शोचे होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. यंदाच्या सीझनची थीम 'स्वर्ग आणि नर्क' अशी असणार आहे. आतापर्यंत 'बिग बॉस मराठी'चे पाच सीझन थाटात पार पडले आहे. दुसरा सीझन आणि पाचवा सीझन खूपच गाजला. दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे ठरला. तर पाचवे सीझन सूरज चव्हाणने गाजवले. नुकतेच 'बिग बॉस मराठी'चे सर्व कलाकार पुन्हा एकत्र स्पॉट झाले.
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री स्मिता गोंदकरने बिग बॉस मराठी स्पर्धकांसाठी ग्रँड रियुनियन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत 'बिग बॉस मराठी सीझन 1' ते 'बिग बॉस मराठी सीझन 5' चे अनेक कलाकार आले होते. राजश्री मराठीने या कार्यक्रमाचे सुंदर व्हिडीओ शेअर केले आहेत. पार्टीत कलाकारांनी भन्नाट डान्स केले. त्यांच्या डान्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात जान्हवी किल्लेकर घनश्यामसोबत डान्स करताना दिसत आहे. तर विकास पाटील, विशाल निकम यांनी एकत्र एन्ट्री घेतली. अंकिता वालावालकर, जान्हवी किल्लेकर सुंदर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाल्या. उषा नाडकर्णी यांनी ड्रेस परिधान केला होता.
स्मिता गोंदकर, विकास पाटील, विशाल निकम, शिव ठाकरे, अंकिता वालावालकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत बिचुकले, अभिजीत सावंत, उषा नाडकर्णी, घनश्याम , मेघा धाडे, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, डिपी दादा, वर्षा उसगांवकर असे अनेक कलाकार पाहायला मिळाले. अभिजीत बिचुकलेचा रॉयल अंदाज पाहायला मिळाला. 'बिग बॉस मराठी'चे पाचही सीझन खूप गाजले. यामुळे कलाकारांना देखील खूप लोकप्रियता मिळाली आहे. वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवा यांनी कपल डान्स केला.
'बिग बॉस मराठी 6' पाहण्यासाठी चाहते आता खूपच उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी 6' चा ग्रँड प्रीमियर 11 जानेवारी रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. यंदा शोमध्ये कोण कोणते कलाकार दिसणार आणि 'बिग बॉस मराठी 6' ची ट्रॉफी कोण उचलणार याकडे प्रेक्षकांचे आतापासून लक्ष लागून आहे. त्यामुळे हा सीझन देखील खूप गाजणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.