Weight Loss Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : Dear Beginners, वर्कआउट सुरु केल्यानंतर शरीरात होतात हे ४ बदल, टेन्शन घेऊ नका

Workout Tips : वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण जीम किंवा व्यायामचा पर्याय निवडतो.

कोमल दामुद्रे

Fitness Tips :

सकाळी उठणे, व्यायाम करणे, जिममध्ये तासनतास घाम गाळणे. फिटनेससाठी या गोष्टी आवश्यक आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे कामाच्या व्यापात आपण दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहातो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण जीम किंवा व्यायामचा पर्याय निवडतो. परंतु, आपण पहिल्यांदाच वर्कआउट केल्यानंतर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. आपले स्नायू दुखू लागतात, शरीर थकल्यासारखे वाटते. यावेळी शरीरात असे अनेक बदल होतात ज्यामुळे आपल्या टेन्शन येते. जाणून घेऊया वर्कआउट केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात ते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. थकवा येणे

मेडलाइन प्लसच्या मते, व्यायाम केल्यानंतर शरीरात थकवा जाणवणे ही सामान्य गोष्ट आहे. तसेच आपल्याला मानसिक (Mental-Health) आणि शारीरिक थकवा येतो. व्यायामामुळे स्नायूंचे आकुंचन वाढते. अशावेळी विश्रांती घेणे गरजेचे आहे.

2. भूक वाढणे

वर्कआउट (Workout) केल्यानंतर शरीराला घाम येऊ लागतो. शरीराला पुन्हा ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आणि स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला योग्य वेळी खाणे गरजेचे आहे. यामध्ये तळलेले अन्नपदार्थ टाळा. तसेच सकस आहार घ्या.

3. स्नायू दुखणे

काही वेळ व्यायाम केल्यानंतर स्नायू ताणले जातात. संपूर्ण शरीर ताणल्यामुळे हातापासून पायांपर्यंत संपूर्ण शरीरात वेदना होतात. त्यामुळे शरीर अशक्त आणि थकवा जाणवू लागतो. वर्कआउट केल्यानंतर काही दिवस ही वेदना जाणवते.

4. सतत तहान लागणे

शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी पाणी (Water) जरुर प्या. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल. वर्कआउट केल्यानंतर घामामुळे घसा कोरडा होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीरात ऊर्जा पुन्हा तयार होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT