First Time Make Up
First Time Make Up Saam Tv
लाईफस्टाईल

First Time Make Up : पहिल्यांदा मेकअप करताय? भीती वाटत आहे, तर 'या' टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Daily Makeup Tips : दररोज मेकअप करणे हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा हिस्सा असतो. सुरुवातीला परफेक्ट मेकअप लूक कॅरी करणे महिलांसाठी अवघड बनून जाते. खास करून बिगीनर्स मेकअप प्रॉडक्ट आणि मेकअप कशा पद्धतीने अप्लाय करायचा या कारणांना घेऊन कंफ्युज असतात.

अशावेळी महिला (Women) काही सोप्या ट्रिक्स वापरून मेकअप करायला शिकू शकतात. मार्केटमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट (Product) अवेलेबल आहेत. अशातच मेकअप पासून वंचित असलेल्या महिलांना मेकअप बद्दल काहीही समजत नाही. त्या पहिल्यांदा मेकअप करताना थोड्या नर्वस झालेल्या असतात.

परंतु आता नरवस व्हायची काहीही गरज नाही. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मेकअप करण्याच्या काही सोप्या टिप्स. या टिप्सच्या मदतीने तुम्ही सुरुवातीपासूनच बेस्ट मेकअप एक्सपर्ट होऊ शकता.

मेकअप प्रेपरेशन -

मेकअप करण्याआधी क्लिनजरच्या सहाय्याने चेहरा स्वच्छ साफ करून घ्या. सोबतच टोनरच्या सहाय्याने तुम्ही चेहरा चांगल्या प्रकारे पुसून घेऊ शकता. असं केल्याने तुमचा चेहरा क्लीन होऊन जाईल. आता चेहऱ्यावरील टोनर सुकल्यानंतर मॉइश्चरायझर लावून घ्या.

मेकअप बेस तयार करा -

मेकअप बेस तयार करण्यासाठी सर्वात आधी लाईट फाउंडेशनच्या मदतीने चेहऱ्यावर टॅप करा. त्यानंतर डोळ्याखाली कन्सीलर लावून ब्लेंड करून घ्या. आता मेकअप ब्रशच्या सहाय्याने ट्रान्सलेशन पावडरला सर्कुलर मोशनमध्ये फिरवून चेहऱ्यावर अप्लाय करून घ्या. असं केल्याने तुमचा मेकअपबेस पूर्णपणे रेडी होऊन जाईल.

आय मेकअप कसा करावा -

मेकअप करण्याआधी सर्वात आधी तुमच्या आवडीचा आयशेडो निवडा. आता ब्रशच्या सहाय्याने प्रॉडक्ट घेऊन डोळ्यांवरती अप्लाय करून सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करा. त्यानंतर डोळ्यांवरती आय लाइनर लावा. सोबतच तुम्ही तुमच्या पापण्यांना आयलाश करलरलच्या सहाय्याने करल देखील करू शकता. त्यानंतर आयलाशेजवरती मस्करा अप्लाय करा.

लीप कलर अप्लाय करा -

आयमेकअप करून झाल्यावर लिप्स आणि गालाला कलर करायला विसरू नका. अशावेळी गालांवरती बलश लावून चांगल्या प्रकारे ब्लेंड करा. आता ओठांवरती लिपस्टिक अप्लाय करा. त्यानंतर ओठांना एकमेकांवरती हलके रगडून तुम्ही लिपस्टिक ब्लेंड करू शकता.

हायलाईटरचा वापर करा -

मेकअपला आणखीन सुंदर बनवण्यासाठी आणि चेहरा ग्लोविंग दिसण्यासाठी हायलाईटरचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला हायलाईटर ब्रशच्या सहाय्याने कपाळावरती, गालांवरती, नोजलाईन वरती, ओठांवरती आणि हनुवटी वरती अप्लाय करायचे आहे. सोबतच हायलाईटरचे प्रॉडक्ट घेताना कमी प्रमाणात घ्या. जेणेकरून जास्त हायलाईटर आल्यामुळे तुमचा मेकअप खराब दिसण्यापासून वाचेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT