OnePlus Nord 2T 5G Launch, Price , Feature
OnePlus Nord 2T 5G Launch, Price , Feature  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

OnePlus Nord 2T 5G झाला भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

कोमल दामुद्रे

मुंबई : वन प्लसने शुक्रवारी भारतीय बाजारात OnePlus Nord 2T 5G लाँच केला आहे. नवीन वन प्लस स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या OnePlus Nord 2 5G हा या स्मार्टफोनला अपग्रेड करुन बाजारात आला आहे.

हे देखील पहा -

OnePlus Nord 2 5G प्रमाणे OnePlus Nord 2T 5G मध्ये 90Hz AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमरा आणि 4500mAh बॅटरीसह आहे. तसेच याचा प्रोसेसर हा octa-core MediaTek Dimensity 1300 SoC आहे आणि तो 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. OnePlus Nord 2T 5G ची स्पर्धा Motorola Edge 30, iQoo Neo 6, Poco F4 5G, Mi 11X आणि Samsung Galaxy A33 5G शी होणार आहे. वनप्लसच्या या आगामी स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

OnePlus Nord 2 5G ची किंमत व ऑफर्स -

वन प्लस नॉड 2 5G मध्ये दोन वेरिएंट आहेत. एक OnePlus Nord 2T 5G च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज याची किंमत (Price) २८,९९९ रुपये आहे तर दुसरा 12GB + 256GB स्टोरेज याची किंमत ३३,९९९ इतकी आहे. हा स्मार्टफोन (Phone) वन प्लसच्या ऑफिशियल साइटवर, वन प्लस स्टोर अॅप, वन प्लस एक्सपिरिअन्स स्टोअर, अमेझॉन व निवडक रिटेल आउटलेटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. याच्या रंगासाठी पर्याय म्हणून ग्रे शॅडो आणि जेड फॉग कलर आहेत. तसेच ५ ते ११ जुलै दरम्यान आयसीआयसीआय या बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने पेमेंटवर १५०० रुपयांची सूट मिळू शकते.(OnePlus Nord 2T Price)

OnePlus Nord 2T 5G चे वैशिष्ट्य -

OnePlus Nord 2T 5G मध्ये ६.४३ इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे व त्याचे रिझोल्यूशन १०८०x २४०० पिक्सेल असून २०:९ आस्पेक्ट रेशो आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. प्रोसेसर हा Octa-core MediaTek Dimension 1300 SoC देण्यात आला आहे. यात १२ जीबी रॅम ते २५६ जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात आला आहे. यात 4500mAh ड्युअल सेल बॅटरी आहे जी 80W Super VOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. f/1.8 अपर्चरसह ५० मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा मधला कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह २ मेगापिक्सेलचा शेवटचा कॅमेरा आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये f/2.4 अपर्चर असलेला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टमसाठी Android 12 वर आधारित Oxygen OS 12.1 वर कार्य करते.(OnePlus Nord 2T Feature)

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पीएम मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात होणार जाहीर सभा

Vastu Tips: चार चाकी गाडीमध्ये ठेवा या वस्तू, Negativity होईल दूर

Supriya Sule On Dynasticism | होय आम्ही घराणेशाहीतून आलो, सुळे यांची कबुली

Lok Sabha Election: काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास आर्थिक सर्वेक्षण करणार, राहुल गांधी यांची घोषणा

Car Fire: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

SCROLL FOR NEXT