आळशी लोक नोकरीसाठी अर्ज करताना अंघोळ करुन या जाहिरात झाली व्हायरल

आजकाल आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नोकरी करण्याचे वेध लागतात.
Viral advertisement
Viral advertisementब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आजकाल आपले शिक्षण (Education) पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नोकरी करण्याचे वेध लागतात. आपल्या हव्या त्या कंपनीत व आपल्या क्षेत्रात नोकरी मिळाली की, आपल्याला काम करण्याची इच्छा देखील होते.

हे देखील पहा -

नोकरीसाठी (Job) आपल्याला त्याची योग्यता, पात्रता व अनुभवाची गरज असते त्यासाठी आपल्याकडून मागणी देखील केली जाते परंतु, आज आपण अशा एका नोकरीविषयी जाणून घेणार आहोत ज्यासाठी आपल्याला कोणत्याही पदवीची किंवा कौशल्याची गरज नाही. ही नोकरी मिळवण्यासाठी आपल्याकडे दोन गुणांची आवश्यकता हवी. जर आपण आळशी व दुखी आहात तर या नोकरीसाठी आपण पात्रतेचे आहोत असे समजूया.

सध्या अशाच एका नोकरीची जाहिरात सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींकडून विचित्र अशी डिमांड करण्यात आली आहे. तसेत अर्ज करणाऱ्या व्यक्तींने मुलाखतीसाठी येताना अंघोळ करून या अशी जाहिरात देखील त्यांनी केली आहे. सध्या ट्विटरवर ही पोस्ट इतकी व्हायरल झाली असून त्यावर केल्या जाणाऱ्या कमेंट ही केल्या जात आहे. ही नोकरी आमच्यासारख्या लोकांसाठी आहे अशा भन्नाट कमेंट केल्या जात आहे.

या नोकरीबद्दल एका अनोख्या जाहिरातीतून लोकांना सांगितले जात आहे. या जाहिरातीला एका दुकानाच्या बाहेर लावले होते. कुठल्या तरी एका व्यक्तीने त्याचा फोटो ट्विटर वर अपलोड केला व ही जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जाहिरातीमध्ये त्यांनी कशा उमेदवाराची गरज आहे हे सांगण्यात आले आहे. सर्वात वरती ठळक फॉन्टमध्ये लिहिले आहे स्टाफची आवश्यकता आहे. यानंतर त्यांना उमेदवारांची गरज कशी आहे हे सांगण्यात आले आहे. फोटोमध्ये लिहिले आहे की, उमेदवार आळशी आणि दु:खी असला पाहिजे ज्यामुळे तो येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचार्‍यांमध्ये मिसळू शकेल. तसेच सी.व्ही घेऊन इथे या आणि येण्यापूर्वी आंघोळ करा असे त्यात नमूद केले आहे.

ही जाहिरात एका दुकानाच्या खिडकीवर लावण्यात आल्याचे काही लोकांनी सांगितले. लोकांनी या नोकरीबद्दल असणाऱ्या अटींना मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. या पोस्टवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. LinkedIn UK ने पोस्टवर टिप्पणी केली आणि लिहिले जेव्हा नोकरीची आवश्यकता खूप प्रामाणिक असते. लोक याला जोक समजत आहेत आणि लोकांनी या पोस्टवर हसणारे इमोजी पाठवले आहेत. त्याच वेळी, एकाने लिहिले मी या कामासाठी तयार आहे तर दुसऱ्याने लिहिले कुठे स्वाक्षरी करायची आहे. सध्या ही जाहिरात लोकप्रिय ठरली आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com