सकाळचाल नाश्ता म्हणजे आता अनेकांसाठी इडली, डोसा, वडा हे पदार्थ झाले आहेत. कारण हे बाहेर सहज उपलब्ध होतात. तसेच घरी देखील झटपट बनवता येतात. या पदार्थांमुळे पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही. त्यामुळे हा सकाळचा बेस्ट नाश्ता आहे.
इडली, डोसा यांसारखे साऊथ इंडियन पदार्थ तयार करण्यासाठी सर्वात आधी पीठ आंबवले जाते. आंबवलेले पदार्थ बनवण्यासाठी पदार्थांना रूम टेम्परेचर पर काही तासांसाठी ठेवण्यात येते. पीठ आंबल्याने त्याची चव आणि पोत बदलते. आंबल्यामुळे पीठ छान फुलते. रुचकर पदार्थ बनवण्यासाठी पीठ लवकर आंबवायचे असल्यास बेकिंग सोडा, यीस्ट तुम्ही यात टाकू शकतात.
रोग प्रतिकारकशक्ती वाढते
नियमित नाश्त्याला आंबवलेले अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे तुमची रोग प्रतिकारकशक्ती वाढते. आजारांशी लढायला तुम्हाला ताकद मिळते. आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
झटपट वजन कमी
आंबवलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यावर वजन वाढण्याचा धोका नसतो. तसेच हे पदार्थ सकस आहारात येतात.
पचनक्रिया सुरळीत
आहारात आंबवलेले पदार्थांचा समावेश केल्यास चयापचय चांगले होण्यास मदत होते. तसेच पोटाशी संबंधित समस्या दूर होऊन आरोग्य चांगले राहते. आंबवलेले पदार्थांच्या सेवनामुळे अँटिऑक्सिडंट्स , व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे असे पदार्थ पचायला हलके असतात.
मूड फ्रेश होतो
आंबवलेल्या पदार्थांमधील गुणर्धम मानसिक ताण-तणाव आणि डिप्रेशन दूर करून मूड फ्रेश करतात.
हृदयाचे आरोग्य उत्तम
पदार्थ आंबवलेले असल्यामुळे त्यांना एक विशिष्ट चव येते. हा एक संतुलित आहार असू शकतो. यामुळे हृदयविकाराच्या समस्या दूर होतात. रक्तदाब नियंत्रणात राहतो. अनेक आंबवलेल्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक असतात जे तुमच्या शरीरातील बॅक्टेरियांशी लढण्याची ताकद तुम्हाला देतात.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.